Prashant Pracharak, Damaji President Shivanand Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics : आमिष दाखवून आमचा गट फोडण्याचा प्रयत्न, प्रशांत परिचारक, शिवानंद पाटलांचा आरोप

Solapur Politics News : "स्व. भारत भालके यांनी या मतदारसंघात 11 वर्ष म्हणून काम केले. मात्र त्यांनी परिचारक गटाला कधीही त्रास दिला नाही. ज्यांना मोठ्या मालकाची शपथ घालून निवडून आणले त्यांनी मात्र परिचारक गट संपवायचा प्रयत्न केला."

हुकूम मुलाणी

Solapur News, 09 August : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या गटातटातील वाद जुन्या चुका यावर पक्षातील नेत्यांकडून विचारमंथन सुरु आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातही निडणुकीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

अशातच आता दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी काही लोकांनी परिचारक गट संपवायचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, स्व. भारत भालके (Bharat Bhalke) यांनी या मतदारसंघात 11 वर्ष म्हणून काम केले. मात्र त्यांनी परिचारक गटाला कधीही त्रास दिला नाही. ज्यांना मोठ्या मालकाची शपथ घालून निवडून आणले त्यांनी मात्र परिचारक गट संपवायचा प्रयत्न केला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटाच्या पाटकळ येथील बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला माजी आमदार प्रशांत परिचारक , संचालक औदुंबर वाडदेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, राज्याचे चित्र बदलण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मालकाला या मतदारसंघातील भाजपचा (BJP) उमेदवार निवडून आणा, त्यासाठी तुम्ही उमेदवार व्हा शब्द टाकला. मात्र, त्यांनी एक पाऊल मागे घेत ही जागा भाजपला निवडून आणण्यासाठी योगदान दिले.

मात्र, या तीन वर्षात सरपंच असो सदस्य असो यांना आमिष दाखवून गट फोडण्याचे काम केले. 2009 पासून परिचारकांनी तालुक्याच्या विकासासाठी योगदान दिले तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून म्हैसाळचे पाणी न मिळालेल्या 11 गावाला पाणी मिळण्यासाठी प्रयत्न केले, मी त्यांच्याच नेतृत्वाखाली यापूर्वी जिल्हा परिषदेचा आरोग्य व शिक्षण खात्याचा सभापती म्हणून काम करत असताना तालुक्यात आरोग्य व शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला.

त्यांच्याच नेतृत्वाखाली दामाजी कारखान्याचा अध्यक्ष म्हणून काम करताना निवडणूक जाहीर झाली. त्यावेळी आम्ही परिचारक (Prashant Paricharak) गटाचे आठ ते नऊ संचालक घ्या, म्हणून विनंती केली. मात्र, त्यांनी ती विनंती धुडाकडून लावत त्यावेळी समविचारी आघाडीच्या माध्यमातून दामाजी कारखान्यावरची निवडणूक लढवली.

सुदैवाने मतदाराने कौल दिला दोन वर्षे दामाजी कारखान्याचा गळीत हंगाम पार पाडताना ऊस उत्पादक कामगार व इतर कुणाचीही देखील देणी थकित ठेवले नाही.सर्वांची देणे वेळेत पार पाडण्याची जबाबदारी परिचारक यांच्या नेतृत्वाखाली काम करताना पार पाडल्याचं पाटील म्हणाले. त्यामुळेच आता येणाऱ्या निवडणुकीत मोठ्या मालकांनी या मतदारसंघाची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन देखील त्यांनी या बैठकीत केले.

तर पोटनिवडणुकीत आपण सगळ्यांनी मिळून मदत केली. मात्र, आपल्या गटाला पहिल्या दिवसापासून त्रास देण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची खंत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, पक्षनेता किंवा पक्षाच्या अडचणीच्या वेळी परिचारक कुटुंबाने सातत्याने माघार घेऊन इतरांना मदत करण्याची भूमिका घेतली. मतदारसंघातील चित्र बदलेल या आशेवर बिनविरोध होणाऱ्या पोटनिवडणुकीत ऐनवेळी वरिष्ठ पातळीवरून घडामोडी घडल्याने 80 हजार मते घेणाऱ्याला माघार घ्यायला भाग पाडले.

पोटनिवडणुकीत आपण सगळ्यांनी मिळून मदत केली. मात्र, आपल्या गटाला पहिल्या दिवसापासून त्रास देण्याचा प्रयत्न सुरू झाला. तालुक्यात स्व. आमदार भालके व मी आमदार असताना आम्ही केवळ विकासाचे राजकारण केले. त्यांच्या माध्यमातून त्यांनी आणि माझ्या माध्यमातून मी निधी मिळवून तालुक्यात सर्वाधिक निधी कसा येईल याकडे आम्ही लक्ष दिलं.

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार नाही, याची काळजी आम्ही निरा भाटकर व उजनीचे पाणी या मतदारसंघात मिळवताना काळजी घेतली. मात्र, सध्याच्या काळात तसं होत नसल्याची खंतही परिचारक यांनी व्यक्त केली. गाव पातळीवरचे वाद हे गावात मिटले पाहिजेत यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. परंतु लोकप्रतिनिधी हे वाद मिटवणारे हवेत, असा टोलाही त्यांनी यावेळी पुढाऱ्यांना लगावला. त्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT