Sudip Chakote Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Congress Vs NCP SP : सोलापूरात आघाडीत 'या' जागांवरून रस्सीखेच; पवार-गांधींच्या निर्णयाकडे लक्ष

Sunil Balasaheb Dhumal

Solapur Political News : सोलापूर जिल्ह्यात विधानसभेच्या ११ जागा असून काही जागांवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. उत्तर सोलापूरवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दावा केला आहे.

मात्र येथून काँग्रेसचे सुदीप चकोते यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. तर दक्षिण सोलापरवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात चढाओढ सुरू आहे.

सोलापूरात शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून शरद पवार Sharad Pawar गटाने उत्तर सोलापूर मतदारसंघावर दावा केला आहे. येथून गेली दोन टर्म राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे डिपॉझीट जप्त झालेले आहे. त्यामुळे आता ही जागा मिळवण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहे.

त्यासाठी इच्छुक म्हणून काँग्रेसचे माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांचे पुतणे सुदीप चाकोते यांनी शक्तिप्रदर्शन करत काँग्रेसकडे अर्ज दाखल केला आहे. यातून जागा राखण्यासाठी उत्तर सोलापूरमध्ये काँग्रेस विरुद्ध शरद पवार गट अशी टशन सुरू झाल्याची चर्चा आहे.

जिल्ह्यातील उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या विधानसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने लिंगायत मतदार आहेत. येथील भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख Vijay Deshmukh हे सुद्ध यात समाजातून येतात. ते चार टर्म आमदर आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीलाही येथून लिंगायत चेहरा देणे भाग पडणार आहे.

त्यातून काँग्रेसमधील सुदीप चाकोते यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. अन्यथा येथील विरोधी उमेदवाराचे डिपोझीट जप्त होण्याची परंपरा कायम राहणार, असे जाणकार सांगतात. त्यामुळे या मतदारसंघाबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राहुल गांधी काय तोडगा काढतात, याची उत्सुकता आहे.

महाविकास आघाडीत सोलापूरातील शरद पवार गटाकडे पंढरपूर-मंगळवेढा, माढा, मोहोळ, करमाळा हे मतदारसंघ राहतील. काँग्रेसने अक्कलकोट, सोलापूर शहर मध्य, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर या मतदारसंघावर दावा केला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचा सांगोला, बार्शी हे मतदारसंघ राहतील, असा अंदाज आहे. मात्र आघाडीत काही जागांसाठी रस्सीखेच होण्याची शक्यताही वाढली आहे. त्यानंतर होणाऱ्या जागा वाटपात कोणती जागा कुणाकडे जाणार हे स्पष्ट होईल.

कोण आहेत सुदीप चकोते..

सुदीप चकोते Sudip Chakote हे माजी आमदार बाबूराव चाकोते यांचे नातू, तर माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांचे पुतणे आहेत. ते लिंगायत समाजातील नेते मानले जातात. राहुल गांधी यांचे जवळचे असलेल्या सुदीप यांच्याकडे काँग्रेसच्या सेवा दल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष पद आहे. आता त्यांनी उत्तर सोलापूरमधून भाजपविरोधात दंड थोपटले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT