Jaykumar Gore addressing the media over the DPDC fund controversy as the political dispute with Praniti Shinde escalates. The Solapur politics debate continues. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics : 'त्यांचा बालहट्ट मी पूर्ण करू शकत नाही, आयुष्यभर टक्केवारी गोळा केली...', जयकुमार गोरेंची शिंदेंवर सडकून टीका

Jaykumar Gore vs Praniti Shinde : 'डीपीडीसीमध्ये मंजूर होणाऱ्या कामांना निधी मिळतोच. कुणाच्या लेटर पॅडवरून असा निधी दिला जात नाही. सभेने जी कामे मंजूर केली आहेत त्यांना निधी मिळतोच. मात्र लेटर पॅडवर दिलेलीच कामे मंजूर झाली पाहिजेत हा त्यांचा बालहट्ट मी तरी पूर्ण करू शकत नाही.'

Jagdish Patil

Solapur News, 23 Nov : भाजप नेते तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यात सध्या शा‍ब्दिक युद्ध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा नियोजन समितीचा निधी केवळ टक्केवारी मिळत नसल्याने दिला जात नाही, असा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला होता.

याच टीकेला आता जयकुमार गोरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ज्यांनी आयुष्यभर फक्त टक्केवारी गोळा केली त्यांना उठता बसता टक्केवारीच दिसते, अशा शब्दात त्यांनी शिंदेंवर हल्लाबोल केला.

प्रणिती शिंदेंच जनतेशी संपर्क कधीच तुटला आहे. त्यांची खासदारकी सध्या दिल्ली व्हाया बॉम्बे अशी सुरू असून त्या सतत खाजगी प्लेन घेऊन फिरत असल्यामुळे आपल्यासारखे सगळे असतील असे त्यांना वाटत असेल, असं म्हणत गोरेंनी त्यांना टोला लगावला.

गोरे म्हणाले, 'डीपीडीसीमध्ये मंजूर होणाऱ्या कामांना निधी मिळतोच. कुणाच्या लेटर पॅडवरून असा निधी दिला जात नाही. सभेने जी कामे मंजूर केली आहेत त्यांना निधी मिळतोच. मात्र लेटर पॅडवर दिलेलीच कामे मंजूर झाली पाहिजेत हा त्यांचा बालहट्ट मी तरी पूर्ण करू शकत नाही.

त्यांनी आयुष्यभर ज्यांनी टक्केवारी गोळा केली आहे त्यांना उठता बसता फक्त टक्केवारीच दिसते. अशा टक्केवारीवाल्यांवर काय बोलणार? त्यांनी सांगितलेली काम न झाल्याने त्यांची टक्केवारी बुडणार असावी, म्हणूनच त्या असे आरोप करत आहेत,' असंही गोरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT