Chandrashekhar Bawankule: महायुतीचे 100 नगरसेवक बिनविरोध,भाजपनं पैसा अन् बळाचा केल्याचा आरोप; मंत्री बावनकुळे म्हणाले...

Mahayuti Politics: 'काँग्रेसची अवस्था वाईट झाली आहे. त्यांच्यासोबत कोणीच राहायला तयार नाही. रोज शेकडो कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहे. नेत्यांमध्ये समन्वय नाही. मुख्यमंत्र्यांचे भाऊ बिनविरोध निवडून आल्याने काँग्रेसच्या नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर अस्वस्थ आहेत,असंही बावनकुळे म्हणाले.
Chandrashekhar Bawankule On Congress .jpg
Chandrashekhar Bawankule On Congress .jpgSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे शंभर नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. यात मुख्यमंत्री यांच्या मामेभावाचाही समावेश आहे. याकरिता भाजपने पैसा आणि बळाचा केला असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. मात्र भाजपचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आरोप खोडून काढले आहे. जनतेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीवर विश्वास दाखवला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

महायुती विकासचा अजेंडा आहे. विकास याच मुद्यावर आम्ही निवडणूक लढवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डबल इंजीन सरकारमुळे राज्याचा झपाट्याने विकास होत आहे. ते जनतेला दिसत आहे. त्यामुळे आम्ही 51 टक्के मते घेऊन स्थानिक निवडणुका जिंकणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.

काही ठिकाणी युती झाली नाही. मात्र त्या ठिकाणी मित्रपक्ष म्हणून आम्ही लढत आहोत. मात्र त्यामुळे मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. सामनामध्ये शिंदे शिवसेनेचे 35 फुटणार या लेखाकडे लक्ष वेधले असता त्यांना फार सिरिअस घेऊ नका असे बावनकुळे म्हणाले.

उद्धव सेनेत काही अस्वस्थ लोक आहेत. तेच काहीतरी लिहित असतात. दिशाभूल करीत असतात. त्याची काळजी करण्याची गरज नाही असेही बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule On Congress .jpg
Nagpur Politics: ‘धन लावा व निवडणूक जिंका‘; मुंबई पालिकेच्या सर्व्हेवरुन वडेट्टीवारांनी भाजपवर केले गंभीर आरोप

सर्वत्र पराभव दिसत असल्याने महाविकास आघाडीत मनसेला घेण्यात येत आहे. बिहार निवडणुकीत फटका बसेल हे बघून आतापर्यंत मनसेसोबत आघाडी करणार नाही असे दावे काँग्रेस (Congress) नेत्यांमार्फत केले जात होते. आता अनुकूलता दाखवली जात आहे. त्यांच्याकडे पर्याय नसल्याने सोयीचे बोलत आहेत.

Chandrashekhar Bawankule On Congress .jpg
Amravati : CM फडणवीसांचे भाऊ बिनविरोध : काँग्रेस प्रदेधाध्यक्षांना दमबाजीची शंका : मोहीम फत्ते करणारे रवी राणा पुन्हा मैदानात

काँग्रेसची अवस्था वाईट झाली आहे. त्यांच्यासोबत कोणीच राहायला तयार नाही. रोज शेकडो कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहे. नेत्यांमध्ये समन्वय नाही. मुख्यमंत्र्यांचे भाऊ बिनविरोध निवडून आल्याने काँग्रेसच्या नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्या बोलत असल्याचे बावनकुळे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com