Shrinivas Patil In NHI Meeting sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad News : महामार्गावरील असुविधेवरून श्रीनिवास पाटलांनी धरले अधिकाऱ्यांचे कान

Umesh Bambare-Patil

-हेमंत पवार

Karad News : टोलनाका परिसराची स्वच्छता राखून तेथे प्रवाशांसाठी स्वच्छ प्रसाधनगृहे उपलब्ध करून द्यावीत. उड्डाणपूलावर व पूलाखाली पथदिवे लावावेत. महामार्गाच्या दुभाजकात फुलझाडे लावून मार्गाचे सुशोभिकरण करावे. अपघाताचा 'एस कॉर्नर' काढावा, अशा सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

राष्ट्रीय महामार्गावरील NHI शिरवळ ते शेंद्रे या टप्प्यातल कामाचा आढावा घेण्यासाठी खासदार पाटील Srinivas Patil यांनी त्यांच्या कराड Karad कार्यालयात बैठक घेतली. राष्‍ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापक संजय कदम, पुणे-सातारा टोलचे व्यवस्थापक संजय कुमार, राकेश कोळी, ए. शर्मा, डी.योगेशाप्पा उपस्थित होते.

खासदार पाटील म्हणाले, शेंद्रे ते शिरवळ निरा नदीपर्यंत महामार्गाच्या सेवा रस्त्याला खड्डे पडल्याने रस्त्ता खराब झाला आहे. त्याची दुरस्ती करुन हा रस्ता वहातूक योग्य करण्यात यावा. तसेच या रस्त्यावर काही ठिकाणी पाणी साचून रहात असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्याचा सर्व्हे करून पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात.

मार्गावर पाणी साचल्याने शेतीचे नुकसान होते. पावसाळयात पाणी साचू नये यासाठी काळजी घ्या. सेवा रस्त्याचे काम करताना शेतकऱ्यांना सहकार्य करा. शेंद्रे कारखाना ते खिंडवाडी दरम्यानचा रस्ता खचला असून चाको-या पडल्या आहेत. येथून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे हा रस्ता कॉंक्रिटकरण करून दर्जा सुधारावा.

आनेवाडी टोल नाकानजीक असणा-या रायगांव फाट्यावर पथदिवे नसल्याने अंधाराचा फायदा घेत लूटमारीचे प्रकार घडत आहेत. तेथे त्वरीत पथदिवे बसविण्यात यावेत. सातारा ते शिरवळपर्यंत महामार्गावर दुचाकीसाठी वेगळी लाईन तयार करण्यात यावी. आनेवाडी टोलनाका परिसराची स्वच्छता ठेवून तेथे प्रवाशांसाठी शौचालयाची सुविधा करण्यात यावी. वेळे येथील नियोजित उड्डाणपूलाच्या कामाला गती द्यावी. तसेच येथील 'एस कॉर्नर' काढून बोगद्याचे काम पूर्ण करावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT