Satara Collector News : तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी जे जे चांगले उपक्रम जिल्ह्याच्या विकासासाठी राबवले त्या चांगल्या परंपरा ही यापुढे सुरू ठेवल्या जातील तसेच कास, महाबळेश्वर, पाचगणी येथील अतिक्रमणांच्या संदर्भात कायदेशीर बाबींचे तथ्य तपासूनच पुढील निर्णय घेतला जाईल , असे आश्वासन त्यांनी दिले जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी येथील
श्री. डुडी Jitendra Dudi यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज नियोजन भवनात पत्रकारांशी संवाद साधला. डुडी म्हणाले, कोणताही निर्णय धडकपणे घेणे हे सहज शक्य आहे. मात्र, असे निर्णय चिरकाल टिकत नाहीत. त्यामागे कृतिशील रचनात्मक कामाची बैठक असावी लागते. त्यासाठी व्यापक प्रयत्नांची आवश्यकता असते. माझा सातारा जिल्ह्याचा Satara District अभ्यास सुरू असून सर्व विभाग प्रमुखांच्या बैठका घेतल्या जातील.
त्यानुसार जिल्ह्याचे पुनर्वसन, सिंचन, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण यातील कोणते प्रश्न बाकी आहेत हे समजून घेणार आहे. शासकिय कार्याला सर्वसामान्यांच्या कामांना कधीही न अडवता तात्काळ ते निकाली कसे निघतील याची दक्षता घेतली जाईल. त्यासाठी मला थोडासा वेळ द्या. सर्व प्रश्नांचा अभ्यास करून त्यानुसार कामाचे प्राधान्यक्रम ठरवलं जाईल.
सातारा जिल्हा कशात आघाडीवर आहे आणि काय होणे गरजेचे आहे. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या दिवशीच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत फलटण, निरा, तरडगाव, बरड या सर्व भागातील ६७ किलोमीटर लांबीच्या पालखी मार्गावरील स्थळांची पाहणी केली. या मार्गावर पायाभूत सुविधा तसेच तीन शौचालये, 25 ॲम्बुलन्स तसेच २१ फिरती आरोग्य पथके तैनात केली आहेत.
या पालखीतळांवर खाद्यपदार्थ विक्रेते येतात त्यांच्या खाद्यांचे नमुने तपासण्याच्या दृष्टिकोनातून अन्न व औषध प्रशासनाला सूचना देण्यात आली आहे. जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी विकास कामांचा ज्या चांगल्या परंपरा निर्माण केल्या त्या परंपरा पुढे नेण्याचा माझा निश्चित प्रयत्न असेल अशी ग्वाही त्यांनी दिली
महाबळेश्वर येथे तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शंभर कोटींचा आराखडा केला होता. त्या आराखड्याचा अभ्यास करून त्या धरतीवर सातारा, पाचगणी, कास तसेच इतर ब आणि क वर्ग पर्यटनस्थळे आहेत. त्यांना सुविधा देणारा आराखडा बनवला जाईल.
महाबळेश्वर येथे मधाचे गाव मांघर प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील उत्पादनक्षम गावांचा अभ्यास करून त्या त्या ठिकाणी ती उत्पादने वाढवण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित भर दिला जाईल. जिल्ह्यातील 42 गावे दरड प्रमुख क्षेत्रामध्ये येतात तेथील भूवैज्ञानिक सर्वेक्षण करून तज्ञांची मते आजमावली जाणार आहेत. त्या पद्धतीने त्या गावांच्या पुनर्वसनाच्या उपाययोजना केल्या जातील.
दिव्यांगाना सर्व सुविधा देणार...
दोन दिवसापूर्वी दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे दूर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हधिकारी डुडी म्हणाले, सर्व शासकीय कार्यालये, शाळा, सामाजिक संस्था व इतर सामाजिक वावर असणाऱ्या संस्था्च्या परिसरात दिव्यांग बांधवांना उपयुक्त असणारे रॅम्प आणि शौचालय याचा आराखडा बनवून ते तातडीने तयार केले जातील. दिव्यांग बांधवांना कुठल्याही कार्यालयात जाताना त्रास होणार नाही, याची निश्चितच काळजी घेतली जाईल. त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी या बांधवांची बैठक घेऊन उपाययोजना केल्या जातील
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.