MP Srinivas Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP : निवडणुकींत ‘राष्ट्रवादी पुन्हा’ हेच गाणं वाजलं पाहिजे... श्रीनिवास पाटील

माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील Balasaheb Patil यांचे ‘मी निगेटिव्ह विचार Negative thinks करतो आणि पॉझिटिव्ह Positive walking चालतो,’ हे वाक्य खूप काही सांगून गेले.

सरकारनामा ब्युरो

शिरवडे : कोपर्डे हवेली (जि.सातारा) येथील विविध विकासकामांची सभा आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीच्याच विजयाच्या निश्चयाने गाजली. पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकांच्या प्रचाराचा जणू नारळच फोडल्याचा संकल्प खासदार श्रीनिवास पाटील यांनी केला. तरुण कार्यकर्त्यांना 'चार्ज' करताना त्यांनी इथून पुढच्या सर्व निवडणुकांतून ‘राष्ट्रवादी पुन्हा’ हेच गाणं गाजलं पाहिजे, असं त्यांनी ठणकावून सांगितले.

कोपर्डे हवेली (जि.सातारा) येथे विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटनाच्या निमित्ताने कऱ्हाड उत्तरेतील राष्ट्रवादीचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र जमले होते. नुकतेच भाजपमध्ये प्रवेश करण्याचे ‘धैर्य’ दाखवून आमदारकीच्या दिशेने ‘कदम’ टाकणाऱ्या संभाव्य उमेदवारांवर सर्वप्रथम पंचायत समितीचे माजी उपसभापती सुहास बोराटे यांनी तोफ डागली.

सध्या तरुण कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागाबाबत समाधान व्यक्त केले. त्यानंतर प्रशांत यादव यांनी विरोधकांचे नाव घेऊन त्यांना मोठ्ठं करू नका, म्हणत समाचार घेतला. देवराज पाटील व शहाजी क्षीरसागरही बरसले. मानसिंगराव जगदाळे यांनीही टोलेबाजी केली.

दरम्यान, खुमासदार शैलीत खासदार श्रीनिवास पाटील यांनी खरी वात पेटवली. तरुण कार्यकर्त्यांना ‘फुल्ल चार्ज’ करताना त्यांनी इथून पुढच्या सर्व निवडणुकांतून ‘राष्ट्रवादी पुन्हा’ हेच गाणं गाजलं पाहिजे, असं ठणकावून सांगितले. आजपर्यंत प्रचारसभेचा नारळ फोडून पाल येथून सुरुवात होते. पण, यंदा कार्यकर्त्यांच्या पाठीशी असणाऱ्या व व्यासपीठाच्या समोर असणाऱ्या श्री सिद्धनाथाच्या साक्षीने प्रचार, मोर्चेबांधणी सुरू झाल्याचे घोषित केले.

माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे ‘मी निगेटिव्ह विचार करतो आणि पॉझिटिव्ह चालतो,’ हे वाक्य खूप काही सांगून गेले. आता बहुतांशी तरुण कार्यकर्त्यांनी राजकारणाची धुरा खांद्यावर घेतल्याबद्दल आमदार पाटील यांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळे सह्याद्रीचे संचालक जशराज पाटील यांच्याकडे भविष्यात जबाबदारी वाढणार असल्याचे संकेतही दिले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT