Shambhuraj Desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad News: सैनिकांच्या प्रश्नाबाबत राज्य सरकार संवेदनशील : शंभूराज देसाई

Shambhuraj Desai मंत्री देसाई म्हणाले, जिल्हा पोलिस मुख्यालयात शहीद जवानांचे एकत्रित स्मारक करण्याचा माझा प्रयत्न राहिल.

सरकारनामा ब्युरो

रेठरे बुद्रुक : शहीद जवानांविषयी नेहमीच आदराची भावना माझ्या मनामध्ये आहे. आजी व माजी सैनिकांबाबत राज्य सरकार संवेदनशील आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून, हे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

रेठरे बुद्रुक येथील शहीद जवान सचिन बावडेकर हुतात्मा स्मारकात शहीद दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपाचे चिटणीस अतुल भोसले, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी मिना साळुंखे, माजी खा. कर्नल सुधीर सावंत, दिनेशकुमार झा, माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता साळुंखे, सरपंच सुवर्णा कापूरकर, उपसरपंच शिवाजी दमामे, शिवाजी बावडेकर, जयाताई बावडेकर, शामबाला घोडके यांची उपस्थिती होती.

मंत्री देसाई म्हणाले, जिल्हा पोलिस मुख्यालयात शहीद जवानांचे एकत्रित स्मारक करण्याचा माझा प्रयत्न राहिल. देशसेवेचे कर्तव्य समजून जवान काम करतात. त्यांच्याबाबत सदैव आदर राखला पाहिजे. सैनिकांच्या प्रश्नासाठी मी पुढाकार घेईन. व त्यांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक करण्याचा प्रयत्न राहील.

अतुल भोसले म्हणाले, आपल्या जिल्ह्याची भारतीय सैन्य दलात वेगळी ओळख आहे. शहीद सचिन बावडेकर यांची वीरगती स्मरणीय आहे.सुधीर सावंत म्हणाले, अमृत जवान योजनेत कऱ्हाड तालुक्याची दिमाखदार काम करण्यात तालुका प्रशासन आघाडीवर राहिले आहे. यावेळी वीरपत्नी स्मिता सावंत, उज्वला निकम , मधुरा पवार यांचा मान्यवरांनी गौरव केला. तसेच ग्रामपंचायतीच्यावतीने वीर माता - पित्यांचा गौरव करण्यात आला. प्रशांत कदम यांनी प्रास्ताविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच कापूरकर यांनी आभार मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT