सोलापूर : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यंदाचा अर्थसंकल्प मांडताना महिलांवर लक्ष केंद्रीत केले आहे. मुलीच्या जन्मापासून तिचे शिक्षण ते लग्नापर्यंत काळजी घेतली आहे. आता मुलींची चिंता देवेंद्र फडणवीस करणार आहेत. काय माहित नाहीत, काय या वेळेस महिलांवर फिदा झालेत आहेत, साहेब. देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा झाले आहेत, असे अजब वक्तव्य राज्याचे माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी केले आहे. (Strange statement of former Cooperation Minister Subhash Deshmukh)
सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक २६ मधील कल्याण नगर येथील रस्ते विकास कामाचे उदघाटन भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना भाजप आमदार देशमुख यांनी हे विधान केले आहे. त्यांच्या या विधानावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत.
देशमुख म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच अर्थसंकल्प मांडला, त्यामध्ये सर्वात जास्त महिलांवर लक्ष केंद्रित केलं आहे. मुलगी जन्माला आल्यावर तिचे स्वागत केले आहे. मुलगी शिकायला गेल्यावर त्यालासुद्धा पैसे द्यायचं ठरवलं. परत पाचवी-सहावीला गेल्यावर पाच ते सहा हजार रुपये त्याच्या खात्यात जमा होतील. दहावीचे शिक्षण झाल्यावर मुलगी १८ वर्षानंतर तिला १५ किंवा १८ हजार रुपये मिळतील.
मुलींची चिंता आता देवेंद्र फडणवीस साहेब करणार आहेत. म्हणजे काय माहित नाही, या वेळी महिलांवर फिदा झाले साहेब. देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा झालेत. महिलांच्या बचत गटासाठी देखील त्यांनी मुंबईत मॉल सुरू केला आहे. महिलांच्या बचत गटातील मालाला मुंबईत मार्केट मिळावं; म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले आहे, असंही या वेळी सुभाष देशमुख म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.