Basavraj Bommai
Basavraj BommaiSarkarnama

Basavraj Bommai News : बसवराज बोम्मई मतदारसंघ बदलणार....मुस्लिम मते निर्णायक ठरत असल्याने शिग्गाव सोडणार?

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, धजदचे प्रदेशाध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांचाही बोम्मईंबाबत सकारात्मक दृष्टिकोन आहे. ही जमेची बाजू आहे.
Published on

बंगळूर : राजकीय गणिते चुकण्याची शक्यता निर्माण झाल्यास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) हे आपला मतदारसंघ बदलण्याची शक्यता आहे. पर्याय म्हणून त्यांची दावणगेरे उत्तर मतदारसंघावर नजर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Chief Minister Basavaraj Bommai constituency will change?)

सध्या बोम्मई हावेरी जिल्ह्यातील शिग्गाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचा कोणत्याही प्रकारे पराभव करण्याचा निर्धार केलेल्या काँग्रेसने माजी मंत्री विनय कुलकर्णी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. शिग्गावमध्ये पंचमसाली आणि मुस्लिम मते निर्णायक असल्याने गेल्यावेळेपेक्षा बोम्मई यांना यंदा विजयासाठी अधिक मेहनत करावी लागणार असल्याची चर्चा आहे.

Basavraj Bommai
MVA Sabha : आजचा दिवस तुमचा; पण उद्याचा आमचा राहील, त्यामुळे जास्त मस्ती करू नका : अंबादास दानवेंनी सुनावले

मुस्लिम मतांचे विभाजन करायचे असल्यास धर्मनिरपेक्ष जनता दलाने (जेडीएस) उमेदवार दिला, तरच बोम्मईचा विजय सुकर होईल. धजदनेही पंचमसाली समाजातील उमेदवार उभा केला, तर बोम्मई यांना मतदारसंघ बदलणे अपरिहार्य ठरेल, अशी चर्चा भाजपच्या गोटात आहे. विशेष म्हणजे जेडीएसचे ज्येष्ठ नेते व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, धजदचे प्रदेशाध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांचाही बोम्मईंबाबत सकारात्मक दृष्टिकोन आहे. ही जमेची बाजू आहे.

आमदार एस. ए. रवींद्रनाथ यांचे वय पाहता त्यांना यावेळी उमेदवारी मिळेल, याबाबत साशंकता आहे. काँग्रेसने धारवाडचे माजी आमदार विनय कुलकर्णी किंवा मंजुनाथ कुन्नूर यांना बोम्मई विरोधात उभे करण्याचा विचार आहे.

Basavraj Bommai
Shivsena News : शिवसेनेचा राम म्हणून ओळख असलेल्या माजी जिल्हाप्रमुखांचा अखेर ‘जय महाराष्ट्र’ : भाजपत प्रवेश करणार

भाजप नेते योगेश गौडर यांच्या खून प्रकरणातील आरोपी विनय कुलकर्णी हे शिग्गावमध्ये बोम्मई यांच्याशी दोन हात करतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे मंजुनाथ कुन्नूर यांना धारवाड मतदारसंघातून उमेदवारी मिळेल. काँग्रेसच्या १२४ उमेदवारांच्या पहिल्या यादीत या दोन्ही जागेसाठी उमेदवार जाहीर केलेले नाहीत. शिग्गावमधून काँग्रेसकडून दहाहून अधिक इच्छुक उमेदवार आहेत. पण २०१८ च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावरील सय्यद अजीम पीर कादरी हे विनय कुलकर्णी यांच्यासाठी आपला मतदारसंघ सोडू शकतात.

Basavraj Bommai
Nitin Gadkari News : ‘नितीन गडकरींना एवढी मते द्याकी मोजणारेही पागल झाले पाहिजेत’

बसवराज बोम्मई यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच जेडीएस प्रमुख एच. डी. देवेगौडा यांची भेट घेतली होती. काँग्रेसने बोम्मईना घेरण्याचा विचार केला, तर जेडीएस रणनीती आखून मुख्यमंत्र्यांच्या बचावासाठी पुढे येऊ शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com