Monica Rajale Vs Pratap Dhakne Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पाथर्डीतील बाजारतळावरील स्वच्छतागृहावरून राजळे-ढाकणे गटांत संघर्ष

भाजपच्या आमदार मोनिका राजळे ( Monica Rajale ) व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे ( Pratap Dhakne ) यांच्या समर्थकांकडून विकास कामांवरून वादा सुरू झाले आहेत.

सरकारनामा ब्युरो

उमेश मोरगावकर

पाथर्डी ( जि. अहमदनगर ) - अहमदनगर जिल्हा परिषद, पाथर्डी पंचायत समिती बरोबरच पाथर्डी नगरपालिकेची निवडणूकही जवळ आली असल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजपच्या आमदार मोनिका राजळे ( Monica Rajale ) व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे ( Pratap Dhakne ) यांच्या समर्थकांकडून विकास कामांवरून वादा सुरू झाले आहेत. ( Struggle between Rajale-Dhakne groups over toilet at Pathardi market )

पाथर्डी बाजारतळावर उभारण्यात येणाऱ्या स्वछतागृहाच्या जागेच्या मुद्द्यावरून आता आमदार मोनिका राजळे गट व प्रताप ढाकणे गट असा संघर्ष निर्माण झाल्याने, पालिका प्रशासनाची कोंडी झाली आहे. राजळे यांनी आमदार निधीतून पालिकेला स्वच्छतागृहासाठी निधी देत डिसेंबर महिन्यात या कामाचे भूमिपूजन केले.

पालिका इमारतीच्या मागील बाजूस हे स्वच्छतागृह उभारण्यात येणार होते. ज्या ठिकाणी ते उभारण्यात येणार आहे, तेथे हे स्वच्छतागृह उभारण्यात येऊ नये, असा दबाव पालिका प्रशासनावर आल्याने, स्वच्छतागृहासाठी निधी उपलब्ध असतानाही पालिकेने हे काम केले नाही.

दोन महिने उलटूनही हे काम न सुरू झाल्याने व्यापारी पेठेतील काही राजळे समर्थक व्यापाऱ्यांनी, निधी दिला असतानाही पालिकेने हे काम का सुरू केले नाही असा सवाल करीत काम तातडीने सुरू करावे, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा पालिकेला दिला. आज ढाकणे समर्थक व्यापारी व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश रासने, संदीप बाहेती, सागर दराडे, देवा पवार, मिनीनाथ भंडारी, अक्रम आतार, संतोष पटवा, सतीश पाथरकर आदी व्यापाऱ्यांनी पालिकेला निवेदन दिले.

त्यात म्हटले आहे, की राजळे यांनी भूमिपूजन केलेली जागा स्वच्छतागृह उभारण्यासाठी योग्य नाही. ज्या ठिकाणी हे काम होणार आहे, त्या कामाच्या जवळच मारुती व खंडोबाचे मंदिर आहे. या ठिकाणी आठवडे बाजार भरत असल्याने, येणाऱ्यांना दुर्गंधीचा मोठा त्रास होणार असल्याने स्वच्छतागृह इतरत्र बांधावे. याच ठिकाणी हे स्वच्छतागृह उभारल्यास व्यापारी व नागरिकांसह आम्ही उग्र आंदोलन छेडू, असा इशाराही दिला आहे. त्यामुळे स्वच्छतागृह उभारावे की नाही, अशा पेचात पालिका प्रशासन आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT