Solapur, 26 January : सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारी देण्यावरून घडलेल्या राजकीय घडामोडींवरून भाजपमधील गटबाजी उघड झाली आहे. महापालिकेनंतर जिल्हा परिषद निवडणुकीतही देशमुखांना विश्वासात न घेताच उमेदवारी देण्याच्या झालेल्या प्रयत्नांतून त्यांच्या खच्चीकरणाचा विडाच पक्षांतर्गत विरोधकांनी उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका निवडणुकीत विजयकुमार देशमुखांप्रमाणेच आमदार सुभाष देशमुख यांनीही थेट राजीनाम्याचा इशारा दिल्यानंतर पक्षांतर्गत विरोधकांनी नरमाईची भूमिका घेतली. मात्र, वर्चस्ववादाच्या राजकारणातून पाडापाडीच्या भीतीमुळे भाजप उमेदवारांमध्ये मोठी असुरक्षिततेची भावना आहे.
दक्षिण सोलापूर (South Solapur) तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट, तर पंचायत समितीचे १२ गण आहेत. हा तालुका सोलापूर दक्षिण व अक्कलकोट या दोन विधानसभा मतदारसंघांत विभागला गेला आहे. आमदार सुभाष देशमुख आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मतदारसंघात अनुक्रमे तीन-तीन गट आणि सात-पाच गण येतात.
सुभाष देशमुखांच्या दक्षिण सोलापूर मतदारसंघातील हत्तूर गटातून काँग्रेसच्या इंदुमती अलगोंडा यांना दिलेला एबी फॉर्म, हत्तूर गणातून बाजार समितीचे संचालक सुरेश हसापुरे, औराद गणातून शिवानंद पाटील, निंबर्गी गणातून छाया दुपारगुडे या काँग्रेस नेते-कार्यकर्त्यांनी भाजपकडून दाखल केलेली उमेदवारी, त्यांच्या उमेदवारीसाठी पक्षांतर्गत दबावाच्या माध्यमातून सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांच्या मतदारसंघात हस्तक्षेप, त्यांना जेरीस आणण्यामागे कोण आहेत, हे लपून राहिले नाही.
माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशाने भाजप निष्ठावंतांच्या नाराजीत आणखी भर पडली आहे. तिकिट वाटपातही डावलण्यात आल्यानंतर सुभाष देशमुख यांनी थेट राजीनाम्याचा निर्वाणीचा इशारा दिला, त्यानंतर पक्षांतर्गत विरोधकांनी काहींशी नरमाईची भूमिका घेतली आहे. मात्र, ज्यांच्या उमेदवारीसाठी देशमुख विरोधकांनी आग्रह धरला, त्यांच्या समर्थकांचा 'भाजप विरोध' कायम आहे. शिवाय वर्चस्ववादातून पाडापाडीचे राजकारण होण्याच्या शक्यतेने 'दक्षिण'मधील भाजप उमेदवारांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.
दोन्ही आमदारांकडे सहा - सहा गण
अक्कलकोट मतदारसंघातील वळसंग गटातील होटगी गण दक्षिण मतदारसंघात आहे. त्यामुळे देशमुख यांच्या वाट्याला सात गण, तर कल्याणशेट्टी यांच्या वाट्याला पाच गण आले आहेत. भाजपचे मळसिद्ध मुगळे यांनी विधानसभेला सुभाष देशमुखांच्या उमेदवारीला विरोध केला होता, त्यामुळे त्यांना मंद्रूप गणातून उमेदवारी देण्यास आमदार देशमुख अनुकूल नव्हते. मात्र त्यांना उमेदवारी देण्यात देशमुख विरोधक यशस्वी ठरले आहेत. मुगळे यांचा कल साहजिकच देशमुख विरोधकांकडेच आहे. त्यांच्या माध्यमातून पक्षांतर्गत विरोधक पंचायत समितीमधील उमेदवारांचे संख्याबळ देशमुखांच्या बरोबरीने राखण्यात यशस्वी झाले आहेत.
दक्षिण मतदारसंघातील गट, गणनिहाय उमेदवार
- मंद्रूप ः सोनाली कडते
- मंद्रूप ः मळसिद्ध मुगळे
- कंदलगाव ः प्रियंका आसबे
- भंडारकवठे ः सविता उंबरजे
- भंडारकवठे ः नेहा कुपसंगे
- निंबर्गी ः अंबिका दुपारगुडे
हत्तुर ः उज्वला हविनाळे
हत्तुर ः पंचप्पा धनशेट्टी
औराद ः संदीप टेळे
होटगी गण ः अंबिका पाटील
अक्कलकोट मतदारसंघातील गट, गणनिहाय उमेदवार
कुंभारी ः श्रृती भोरगुंडे
कुंभारी ः सूरज पाटील
धोत्री ः शिल्पा बिराजदार
बोरामणी ः नेताजी खंडागळे
बोरामणी ः वर्षा पटणे
कासेगाव ः विजय राठोड
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.