Solapur News : विधानसभेची निवडणूक आता जवळ आली असतानाच राज्यात सर्वत्र वातावरण तयार होण्यास सुरवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर मतदार संघात भाजपला आता पक्षातील नाराजीला सामोरे जावे लागणार असे चित्र निर्माण झाले आहे. दक्षिण सोलापुरातील विद्यमान आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे तसेच त्यांच्या गटातील सभागृह नेत्यासह 7 नगरसेवकांनी प्रशासकीय अनुभव असलेले जिल्ह्यातील युवा चेहरा ऍड सोमनाथ वैद्य यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
सोलापूर महानगर पालिकेचे माजी उपमहापौर भाजप नेते राजेश काळे यांनी आज सोमनाथ वैद्य यांना आज पाठिंबा जाहीर केला आहे. सोमनाथ वैद्य यांना मंत्रालय कामकाज प्रशासकीय अनुभव असून त्यांचे मतदारसंघातील काम सर्व जनतेपर्यंत पोहचत असून त्यांना मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याने पक्षाने सुद्धा यावेळी सुभाष देशमुख यांच्या ऐवजी युवा नेतृत्व सोमनाथ वैद्य यांना उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी माजी उपमहापौर राजेश काळे यांनी व्यक्त केली आहे.
सोमनाथ वैद्य यांच्यारूपाने भाजपला(BJP) लिंगायत समाजातील एक आश्वासक चेहरा मतदारसंघात मिळाला असून त्यांना इतर अनेक समाजाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. सोमनाथ वैद्य यांनी गेल्या काही महिन्यांपासून मतदारसंघात कामांचा आणि कार्यक्रमांचा धडाका लावला असून दररोज ते मोठ्या प्रमाणात जनतेत जाऊन सर्व समाजातील लोकांना मदत करत आहेत. सोमनाथ वैद्य यांना आतापर्यंत शहरी भागातील 7 नगरसेवक तसेच ग्रामीण भागातील 13-14 सरपंचाचा पाठिंबा मिळाला आहे.
भाजपने सोमनाथ वैद्य यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी सुद्धा कोणाला उमेदवारी देईल याची उत्सुकता सोलापुरात शिगेला पोहचली आहे. सध्यातरी सुभाष देशमुख यांच्यावतीने उमेदवारीबाबत कुठलेही वक्तव्य आलेले नाही.
सोमनाथ वैद्य यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या दहीहंडीचे आयोजन नुकतेच केले होते. तसेच गुरुपोर्णिमे निमित्त 51 हजार लाडू वाटप, स्वातंत्र्य दीनानिमित ध्वज वाटप, धान्य किट वाटप, छत्री वाटप, श्रावणी सोमवार निमित महाप्रसाद वाटप, युवकांसाठी अनेक स्पर्धेचे आयोजन, महिलांसाठी पर्स वाटप, विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप, महापुरुष जयंती निम्मित अन्नदाधान्य वाटप असे अनेक उपक्रम सोमनाथ वैद्य यांनी स्वयम शिक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून दक्षिण सोलापुरात आयोजित केले आहेत.
सोमनाथ वैद्य यांना 19 वर्ष प्रशासकीय कामांचा अनुभव असून त्यांनी आजपर्यंत अनेक आमदार तसेच सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांच्यासाठी स्वीय सहायक म्हणून काम केले आहे. तसेच भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांचे ते 10 वर्षांपासून पीए म्हणून काम पहात आहेत याच कामाचा त्यांना मतदारसंघातील प्रश्न समजून घेताना फायदा होत असून मतदारसंघातील जनतेच्या सुद्धा ते पसंतीस उतरत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.