Manoj Jarange Patil Agitation; Sudhir Mungantiwar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : 'मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही'; भाजपच्या बैठकीआधीच भाजपच्या माजी मंत्र्याचे धक्कादायक विधान

Sudhir Mungantiwar Statement Creates Political Stir : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले असून त्यांच्या आंदोलनावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे. पण त्यांनी केलेल्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Aslam Shanedivan

Manoj Jarange Patil Agitation Latest News : मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणा दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या राज्य कार्यकारिणीची पुण्यात बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे पुण्यात दाखल झाले आहे. यावेळी त्यांनी विविध विषयांसह मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी संबंधित प्रश्नावर भाष्य केलं.

त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करताना, सरकार नेहमीच संवाद करण्यासाठी तयार असून संवादातूनच समाधानाकडे जाण्याचा मार्ग असतो, असे मुनगंटीवार म्हणाले. याचवेळी त्यांनी मी केवळ एक आमदार असून सरकारचा भाग नाही, असे म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळेच आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून हे विधान नेमकं का केलं असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी संबंधित प्रश्नावर बोलताना मुनगंटीवार यांनी, सरकार संवाद करण्यास तयार असून तर अडतंय कुठे? असा सवाल केला आहे. तर संवादातून समाधानाकडून जाण्याचा मार्ग असून देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही संवाद करायला तयार आहोत, अस तीनदा सांगितलं आहे.

कुठे अडतंय याची आपल्याला माहीत नाही. मी एक आमदार असून लोकप्रतिनिधी आहे. मी सरकारचा भाग नाही. यामुळे मी संवादाच्या टेबलवर बसत नाही, असेही स्पष्टीकरण मुनगंटीवार यांनी दिलं आहे. त्यांच्या या विधानामुळे आता एकच खळबळ उडाली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या राज्य कार्यकारिणीची पुण्यात होणाऱ्या बैठकीवर देखील त्यांनी भाष्य केलं आहे. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

रवींद्र चव्हाण यांनी, पुण्यात राज्य कार्यकारिणीची बैठक व्हावी अशी स्थानिक कार्यकर्त्यांची आणि नगरसेवकांची इच्छा होती. त्यांच्या या मागणीवरूनच या बैठकीचे येथे आयोजन करण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT