Sudhir Mungantiwar Setback : सभागृहात भाजपला नडणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांना धक्का : समर्थकांचा भरणा असलेल्या कार्यकारिणीला प्रदेशाध्यक्षांची महिन्याभरातच स्थगिती

Ravindra Chavan Chandrapur BJP Executive Committee Suspended : चंद्रपूर भाजपच्या ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्थगिती दिली आहे. यामुळे जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
BJP district executive suspension; Sudhir Mungantiwar
BJP district executive suspension; Sudhir Mungantiwarsarkarnama
Published on
Updated on

Chandrapur Political News : चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाचा अखेर स्फोट झाला असून अवघ्या महिन्याभरात नव्याने घोषित करण्यात आलेल्या कार्यकारिणीला स्थगिती देण्यात आली आहे. 4 जून रोजी चंद्रपूर ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली होती. ज्यात माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थकांचा भरणा होता. यावरूनच पक्षात नाराजी उफाळली होती. यावरूनच काही नेत्यांनी प्रदेश नेतृत्वाकडे तक्रार दाखल केली होती. ज्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नव्या कार्यकारिणीला स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे भाजपचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

एकीकडे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा हे मुनगंटीवार विश्वासू मानले जातात. तर दुसरीकडे त्यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीलाच प्रदेशाध्यक्षांनी स्थगिती दिली आहे. ही बाब मुनगंटीवार यांच्या जिव्हारी लागणारी आहे. चंद्रपूर इतिहासात अशा पद्धतीने भाजपची ग्रामीण कार्यकारिणी पहिल्यांदाच स्थगित करण्यात आली आहे. यावरून आता राजकीय प्रचंड खळबळ उडाली असून पक्षांतर्गत राजकारणाला वेग आला आहे.

जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी याच महिन्याच्या 4 जून रोजी जिल्हा ग्रामीण कार्यकारिणी मोर्चा आणि विविध प्रकोष्ठांच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली होती. यानंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे बॅनरही जिल्हाभर झळकले होते. त्यानंतरच जिल्ह्यात काही विशिष्ट नेत्यांनाच झुकते माप दिले जात असल्याचा आरोप करत भाजपच्या काही नेत्यांनी थेट प्रदेश नेतृत्वाकडे तक्रार केली होती.

BJP district executive suspension; Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar news : मुनगंटीवारांनी भाजपलाच आणलं अडचणीत; थेट मंत्र्यांविरोधात मांडला हक्कभंग, विधानसभेत तावातावाने बोलले...

तसेच या नाराज गटाने जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी निर्णय घेताना पक्षातील इतर प्रमुख नेते, विद्यमान आमदार तसेच माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांना विश्वासात घेतले नाही असाही आरोप देखील केला होता. याच आरोप आणि तक्रारींची दखल आता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महाराष्ट्र भाजपाचे प्रभारी शिवप्रकाश यांनी घेतली.

तसेच अवघ्या महिन्याभरात नव्याने घोषित करण्यात आलेल्या कार्यकारिणीला स्थगिती दिली आहे. तर या स्थगितीचे पत्र भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. संजय कुटे यांच्या स्वाक्षरीने 29 जून रोजी जारी करण्यात आले.

BJP district executive suspension; Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar News: सुधीर मुनगंटीवार 12 वर्षांनंतर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये: 40 वर्षांच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच अधिकाऱ्याविरोधात दिली तक्रार

दरम्यान आता लवकरच नव्या कार्यकारिणीची घोषणा होण्याची शक्यता असून यात सर्व गटांना प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र या सर्व घडामोडींमुळे जिल्ह्यातील भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. तर या तीव्र असंतोषाकडे पक्ष नेतृत्व कसे पाहते? वादावर कसा तोडगा काढला जातो? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com