Budget Session Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Help For Bjp's Sugar Factories: राज्यातील सात भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना मिळणार १०३१ कोटींचे कर्ज : हे आहेत नेते....

भारतीय जनता पक्षाचे नऊ कारखाने घेतले तर किमान तीन ते चार तरी विरोधी पक्षाशी संबंधित घेतले पाहिजेत ना?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राज्यातील सात नेत्यांच्या सहकारी साखर कारखान्यांना (Sugar Factory) १०३१ कोटी रुपये कर्ज मिळणार आहे. राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडून (एनसीडीसी) त्यासंदर्भातील टिप्पणी आल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले. साखर कारखान्यांना मदत करताना फक्त भाजप नेत्यांनाच झुकते माफ का, असा सवालही त्यांनी केला. (Sugar mills of seven BJP leaders in the state will get a loan of 1031 crores)

विधानसभेत अजित पवार यांनी भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांची यादीच वाचून दाखवली. साखर कारखान्यांमुळे महाराष्ट्रात आर्थिक सुबत्ता आली आहे. मात्र, मदत करताना एवढं एकतर्फी करून कसं चालेलं. एवढं दुजाभाव करू नका, अशी विनंतीही त्यांनी केली.

या यादीत गणेश सहकारी साखर कारखाना, पद्यश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखाना (दोन्ही राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संबंधित), शेतकरी सहकारी साखर कारखाना, किल्लारी (आमदार अभिमान्यू पवार), रामेश्वर सहकारी साखर कारखाना (केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे), कर्मवारी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना, नीरा भीमा सहकारी साखर कारखाना (दोन्ही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील), शंकर सहकारी साखर कारखाना (आमदार रणजितसिंह मोहिते पाटील), वैद्यनाथ साखर कारखाना (पंंकजा मुंडे), भीमा सहकारी साखर कारखाना (खासदार धनंजय महाडिक) फक्त भाजप नेत्यांच्याच कारखान्यांचा समावेश आहे.

जे पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीत होते, तोपर्यंत त्यांचे कारखाने तिकडे नव्हते. आता ते भाजपमध्ये गेले की चांगले झाले. गोमूत्र शिंपडल्यानंतर जसं पवित्र होतं, तसा प्रकार भाजपमध्ये गेल्यानंतर होतो. भारतीय जनता पक्षाचे नऊ कारखाने घेतले तर किमान तीन ते चार तरी विरोधी पक्षाशी संबंधित घेतले पाहिजेत ना. एवढं एकतर्फी असतं का हो, असा सवालही अजित पवारांनी केला.

राज्यातील इतरही सहकारी साखर कारखान्यांना कर्जाची आवश्यकता आहे. नियमांच्या अधिन राहून त्यांनाही कर्ज द्या, नियमांच्या बाहेर जाऊन द्या, असे मी म्हणणार नाही. त्यांचे अर्ज सरकारकडे आलेले आहेत. पण, ते सत्ताधारी पक्षाशी संबंधित नाहीत, म्हणून त्यांना न देणे चुकीचे आहे. काही गोष्टी चुकीच्या झाल्या असतील, पण पाच-दहा टक्क्यांसाठी नव्वद टक्क्यांना शिक्षा का? असा सवालही त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT