Assembly Session: रासायनिक खते खरेदी करताना जात सांगावी लागणार; विरोधक आक्रमक; मुनगंटीवारांनी लढवला किल्ला

नव्या सरकारच्या काळात ई-पॉस मशिनमध्ये जातीचा रकाना नव्याने टाकला आहे.
Sudhir Mungantiwar-Prithviraj Chavan-Ajit Pawar
Sudhir Mungantiwar-Prithviraj Chavan-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारली जात आहे. तशी नोंद ई-पॉस मशिनमध्ये केली जाते. शेतकरी हीच आमची जात आहे. मात्र, रासायनिक खते खरेदी करताना जात का विचारली जात आहे, अस संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विचारला. (Caste should be mentioned while buying chemical fertilizer)

नव्या सरकारच्या काळात ई-पॉस मशिनमध्ये जातीचा रकाना नव्याने टाकला आहे. जातीचा रकाना भरल्याशिवाय खत खरेदी पुढे जात नाही. खत खरेदी करताना नाव, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक आणि आता जात विचारली जात आहे. सरकारने जातीचं लेबल लावू नये. आमच्या भावना तीव्र आहेत. यामध्ये अधिकारी बळीचे बकरे बनू नयेत. मात्र, जो मुद्दामहून अशी गडबड करतोय, याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. खत खरेदी करताना शेतकऱ्याला जात सांगावी लागणार नाही, असा सरकारने आदेश काढावा, अशी माणगीही अजित पवार यांनी केली.

Sudhir Mungantiwar-Prithviraj Chavan-Ajit Pawar
BJP News: भाजपच्या गळाला मोठा मासा : खासदार करणार पक्षात प्रवेश

त्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, ई-पॉस मशिनमध्ये जो बदल करण्यात आलेला आहे, तो फक्त सांगलीपुरता मर्यादीत नाही. हा आदेश राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. पण आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की, ई पॉस मशिनमध्ये केंद्र सरकारच्या आदेशानुसार बदल करण्यात आलेला आहे. हे खरं असेल तर हा बदल कोणी केला आहे, तो आदेश देण्याचे कारण काय. आपण महाराष्ट्रात जातपात समजवण्याचा प्रयत्न करत असताना हे सरकार त्याला प्रोत्साहन देत आहे का, असा सवालाही चव्हाण यांनी सरकारला केला.

Sudhir Mungantiwar-Prithviraj Chavan-Ajit Pawar
Ajit Pawar News : 1 एप्रिलला नागरिकांना मोठा 'शाॅक' बसणार; अर्थसंकल्पानंतर अजित पवारांचा खळबळजनक दावा

मुनगंटीवारांनी सांभाळली सरकारची बाजू

यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, ही बाब गंभीर आहे. गैरसमज पसरू नये. अफवा पसरविण्याचे काम होऊ नये, म्हणून मी बोलत आहे. चूक झाली असेल त्याची दुरुस्ती झाली पाहिजे. राईची पर्वत करण्याची सवयी काहींना लागल्या आहेत. जात नाही तर खत नाही, असा कोणताही निर्णय सराकरने केलेला नाही. राज्याचे कृषी सचिव डावरे यांना ही गोष्ट लक्षात आणून दिली आहे. केंद्राला याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे. ही जी चूक झाली आहे, ती तातडीने दुरुस्त करण्याची विनंती करण्यात आली आहे. ती चूक केंद्राकडून दुरुस्त केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com