Raju Shetty latest statement on sugarcane : राज्य सरकार यंदाचा ऊस गळीत हंगाम हा ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा फटका बसू शकतो. यंदा गळीत हंगाम लवकर सुरू करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध दर्शवला असून माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना विचारात घेतल्याशिवाय हंगाम चालू करू नये असा इशारा राज्य सरकारला दिला आहे.
साखर कारखाने लवकर सुरू करण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध असेल. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय उसाचा हंगाम सुरू करू देणार नाही. साखर कारखाने लवकर सुरू केल्यास उताऱ्यामध्ये एक ते दीड टक्क्याचा फरक पडू शकतो. त्यामुळे शेतकऱ्याचे प्रति टन 600 रुपये नुकसान होणार आहे.
शेतकऱ्यांचे होणारे नुकसान सरकार भरून देणार आहे का? असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला. लवकर साखर कारखाने सुरू केल्याने देशातील 30 ते 35 लाख टन साखर कमी उत्पादीत होईल. यंदा देशामध्ये 338 लाख टन साखर उत्पादित होण्याचा अंदाज आहे, असेही शेट्टी म्हणाले.
दिवाळी सणामध्ये साखरेचा तुटवडा निर्माण होईल या भीतीने सरकार यंदा उसाचा गळीत हंगाम लवकर सुरू करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी मंत्री समितीची उद्या महत्वाची बैठक पार पडणार आहे. यामध्ये उसाचा गळीत हंगाम कधी सुरू करायचा याचा निर्णय होणार आहे. गेल्या हंगामात साखरेचे कमी झालेलं उत्पादन आणि त्यामुळे साखरेचे वाढलेले दर नियंत्रणात आणण्यासाठी यंदाचा गळीत हंगाम लवकर सुरू केला जाणार आहे.तसे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत.
दरवर्षी उसाचा गळीत हंगाम नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू केला जातो मात्र यावेळी 15 ऑक्टोबर पासूनच उसाचा हंगाम सुरू सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे.मात्र याला कारखानदारांनी विरोध दर्शवला आहे. जर उसाचा हंगाम लवकर सुरू केला तर उताऱ्यामध्ये त्याचा परिणाम जाणवतो. त्यामुळे साखर कारखानदार लवकर हंगाम सुरू करण्यास तयार होत नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.