PMC News: मुख्यमंत्र्यांकडे तक्रार अन् मुरलीधर मोहोळांची पालिकेत एन्ट्री; नाराज भाजप नगरसेवकांची घेणार ‘शाळा’

Murlidhar Mohol Meeting BJP Corporators: नाराज भाजप नगरसेवकांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ यांनी बैठक बोलावली असून, पक्षांतर्गत मतभेद मिटवण्यासाठी डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरू आहे.
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुणे महानगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी आणि नगरसेवकांची वाढत चाललेली नाराजी रोखण्यासाठी आता थेट केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मैदानात उतरणार आहेत. महापालिकेतील कारभाराबाबत नगरसेवकांच्या तक्रारी वाढत असताना मोहोळ यांनी सर्व नगरसेवकांची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या बैठकीतून भाजपच्या नगरसेवकांना काय कानमंत्र मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महापालिका निवडणुकीत पुणेकरांनी भाजपला एकहाती सत्ता दिली. तब्बल १२६ नगरसेवक भाजपचे असून, महापालिकेतील प्रमुख पदांवरही भाजपचाच वरचष्मा आहे. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच कारभारावरून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये विसंवाद असल्याची चर्चा असतानाच नगरसेवकांमध्येही नाराजी वाढत आहे.

महापालिकेच्या मागील सर्वसाधारण सभेत झालेल्या धोरणात्मक निर्णयांपासून निविदा प्रक्रियेपर्यंत अनेक मुद्द्यांवर नगरसेवकांनी आक्षेप घेतले आहेत. निधी मिळत नसल्याची, तसेच सभागृहात बोलण्याची संधी मिळत नसल्याची तक्रार काही नगरसेवकांनी केली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजीला वेळीच लगाम घालण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.

Murlidhar Mohol
Dilip Walse Patil: ‘याच’ आश्वासनामुळे शरद पवारांची साथ सोडली; वळसे पाटलांनी सांगितला अजित पवारांसोबत जाण्याचा किस्सा

नगरसेवकांशी थेट संवाद

याच पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ यांनी नगरसेवकांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. नगरसेवकांना मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि महापालिकेतील कामकाजाची सखोल माहिती देऊन त्यांची कार्यक्षमता वाढविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Murlidhar Mohol
Shiv Sena News: ‘छटाकभर गावात 2-2 दुकाने!’; शिवसेना आमदाराचा पक्षालाच घरचा आहेर, गटबाजीवर सुनावले

विशेष म्हणजे, पक्षाची एकहाती सत्ता असूनही महापालिकेत समाधानकारक कामगिरी करता येत नसल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे महापालिकेतील कारभारावरून भाजपची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी मोहोळ यांच्याकडून ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न सुरू असल्याचे मानले जात आहे.

Murlidhar Mohol
Someshwar Election: सुनेत्रा पवारांचं आवाहन युगेंद्र पवारांनी 24 तासांतच धुडकावलं : सोमेश्वरच्या निवडणुकीत पॅनेलची घोषणा

मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीचीही चर्चा

महापालिकेतील कारभाराबाबत भाजपच्या काही नगरसेवकांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्याची चर्चा आहे. या तक्रारीची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे आता मोहोळ यांच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

महापालिकेच्या गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपूर्वी नगरसेवकांची ही बैठक होणार असल्याने त्यामध्ये नेमकी काय चर्चा होते, कोणाला काय सूचना दिल्या जातात आणि नगरसेवकांच्या नाराजीवर काय तोडगा काढला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपची सत्ता, नगरसेवकांची नाराजी आणि वाढते अंतर्गत मतभेद या पार्श्वभूमीवर मोहोळ यांची ‘नगरसेवकांची शाळा’ पक्षासाठी कितपत प्रभावी ठरते, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com