Swabhimani Shetkari Saghatna Protest  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sugarcane Protest : 'स्वाभिमानी'चे ऊस दर आंदोलन आणखी तीव्र; माजी मंत्र्यांच्या कारखान्याला जाणारी ऊस वाहतूक रोखली

Swabhimani Shetkari Saghatna Protest : ऊस दराबाबत मुंबईत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सहकार मंत्री यांच्यातील बैठक निष्फळ ठरली.

Ganesh Thombare

विशाल वामनराव पाटील

Karad News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उस दरासंदर्भातील आंदोलनाची तीव्रता आणखी वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. आता 'स्वाभिमानी'ने माजी सहकार मंत्र्यांच्या कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखली आहे. त्यामुळे ऊस दर आंदोलनावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

ऊस दराबाबत मुंबईत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सहकार मंत्री यांच्यातील बैठक निष्फळ झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कराड तालुक्यातील मसूर येथे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखण्यात आली आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज सायंकाळी आठ वाजेपर्यंत अल्टिमेट दिलेला असताना कराड तालुक्यात त्या अगोदरच स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बुधवारी पुणे- बेंगलोर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. त्या अगोदर नवीन प्रस्ताव 'स्वाभिमानी'कडून कारखानदारांना तसेच सहकार मंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी आज रात्री आठ वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. मात्र, त्या अगोदरच कराड तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, उपाध्यक्ष दादासाहेब यादव, राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुन साळुंखे, कराड उत्तरचे अध्यक्ष प्रमोद साळुंखे कराड, दक्षिणचे अध्यक्ष बापूसाहेब साळुंखे, पक्षाचे तालुकाध्यक्ष रामचंद्र साळुंखे, उत्तम साळुंखे यांच्यासह प्रहार संघटनेचे मनोज कुमार माळी यांनी ऊस वाहतूक करणारी वाहने रोखली आहेत.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर कारखान्यांकडे वारंवार ऊस दर जाहीर करावा, अशी मागणी होती. परंतु, साखर कारखाने ऊसदर जाहीर करत नसल्याने राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको केला. या पार्श्वभूमीवरच आज मुंबई येथे सहकार मंत्री आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. मात्र, ही बैठक निष्फळ ठरल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

त्यामुळे उद्या बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत पुणे- बेंगलोर महामार्गावरती चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला. तसेच मागील दर आणि चालूचा दर याबाबत नवीन प्रस्तावही साखर कारखाना व सरकारकडे दिला आहे‌.

त्यासाठी आज रात्रीची आठ वाजेपर्यंत वेळ दिली. मात्र, कराड तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना यापूर्वीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून त्यांनी मसूर येथे मोठ्या प्रमाणावरती सह्याद्री सहकारी साखर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक वाहने रोखली आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT