Sugarcane FRP Protest: राजू शेट्टींचा कारखानदारांना 8 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; आता 'स्वाभिमानी'ने दिला नवा प्रस्ताव

Swabhimani Shetkari Saghatna Protest : स्वाभिमानी शेतकरी संघटना एक पाऊल मागे येण्यास तयार, आता कारखानदारांच्या निर्णयाकडे लक्ष
Raju Shetti
Raju ShettiSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कारखानदार आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिसीद्वारे उपस्थिती लावली.

या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना एक नव्हे, तर तीन पावले मागे येऊन मागील हंगामातील तुटलेल्या 400 रुपयेऐवजी 100 रुपये तरी कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावेत, अशी मागणी केली आहे. सायंकाळी 8 वाजेपर्यंत निर्णय न झाल्यास उद्याच्या आंदोलनावर ठाम असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raju Shetti
Kolhapur Politics : कोल्हापुरातील थेट पाइपलाइनच्या श्रेयवादात मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उडी

या बैठकीनंतर माझी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सहकारमंत्र्यांसमोर आम्ही एक नव्हे तीन पाऊल मागे आलो आहे. त्यांना शेवटचं सांगितले आहे, त्यांना संयमाने आणि शांतपणे सांगितले आहे. आम्ही शेवट 100 रुपये घेण्यास तयारी दाखवली आहे. त्याखाली एक रुपया घेणार नाही.

आज संध्याकाळपर्यंत कारखानदारांनी मागील उचल जाहीर नाही केली, तर आमचे आंदोलन सुरूच राहील. पण जाहीर केल्यास आंदोलन न करण्याचा विचार केला जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारसह कारखानदारांना दिला आहे.

जर कारखानदार मुंबईतून येताना पैसे देण्यास तयार झाले, तर उद्याच्या आंदोलनाबाबत विचार करू, आज रात्री 8 वाजेपर्यंत कारखानदार यांना मुदत देण्यात आली आहे. काही साखर कारखाने कामगारांना आंदोलनाला पाठवत आहेत. म्हणजे शेतकरी आणि कामगार यांच्यात संघर्ष लावत आहेत. हसन मुश्रीफ आणि बंटी पाटील यांनी कारखानदारांना एकत्र केले आहे. आम्ही सरकार आणि कारखानदार यांना निर्णय मागे घ्यायला आम्ही भाग पाडू, आता काय व्हायचं ते होऊन जाऊ दे, अशा शब्दांत राजू शेट्टी यांनी राज्य सरकार आणि कारखानदारांना इशारा दिला आहे.

बैठक निष्फळ ठोस निर्णय नाही...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आत्तापर्यंत तीन बैठका कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडल्या. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने स्वाभिमानी शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम राहिल्याची भूमिका होती.

गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटना चक्काजाम आंदोलन करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीतही तोडगा न निघाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना उद्या शिरोली येथे राष्ट्रीय महामार्ग रोखणार हे निश्चित मानले जात आहे. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटना 400 रुपयांवरून 100 रुपये देण्याची मागणी केली.

रात्री आठ वाजेपर्यंत निर्णय न झाल्यास त्याचा चक्काजाम आंदोलन होणार आहे, असे शेट्टी यांनी सांगितले. या बैठकीला सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार प्रकाश आवाडे, गणपतराव पाटील, माधवराव घाटगे, साखर आयुक्त चंद्रकांत पुलकंडवार, कोल्हापूर जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यासह आदी उपस्थित होते.

(Edited By - Ganesh Thombare)

Raju Shetti
Bidri Sugar Factory: केपींच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी आबिटकर सेना सज्ज; रणशिंग फुंकले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com