अहमदनगर - कर्जतचे संत सदगुरू श्री गोदड महाराज रथ यात्रे निमित्त भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी पालखीचे दर्शन घेऊन पारंपरिक रथ ओढला. या प्रसंगी उपस्थित पत्रकारांशीही त्यांनी संवाद साधला. त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर सावरा सावर केली. तर आमदार रोहित पवार यांनी तरुणांना संधी देण्याच्या वक्तव्यावर, देवेंद्र फडणवीस हेही तरुण असल्याचा टोला लगावला. ( Sujay Vikhe said: Devendra Fadnavis is young and will take the right decision )
आम्ही मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. या वक्तव्याची ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सह अनेकांनी फिरकी घेतली. सोशल मीडियावर या वक्तव्यावरून टीका होत आहे.
या वक्तव्या संदर्भात डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांना तसं म्हणायचं नव्हतं, तर ज्यावेळी मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांना ते अपेक्षित नव्हतं. मात्र चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली हे सरकार आताच काय तर पुढचा पाच वर्षांचा देखील कार्यकाळ पूर्ण करेल, असे भाकीतही त्यांनी व्यक्त केले.
2024नंतर तरुणांना निर्णय घ्यावे लागतील. ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार हे मार्गदर्शन करतील असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी केले होते. यावर डॉ. विखे पाटलांनी सांगितले की, रोहित पवारांचे वक्तव्य बरोबर आहे. देवेंद्र फडणवीस हे तरुण नेते आहेत आणि येत्या काळात तेच योग्य निर्णय घेतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
या प्रसंगी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, अशोक खेडकर, दादासाहेब सोनमाळी, काकासाहेब ढेरे, अनिल गदादे, विनोद दळवी, नगरसेविका मोहिनी पिसाळ, गणेश क्षीरसागर, काका ढेरे, बबनराव लढाणे आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.