सुजय विखे म्हणाले आम्ही शिवसेनेसोबतच...पण...

खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी पारनेर तालुक्यातील एका कार्यक्रमात शिवसेने संदर्भात केलेल्या वक्तव्याचा आज त्यांनी खुलासा दिला.
Dr. Sujay Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - पारनेर तालुक्यातील विखे गटाचे कार्यकर्ते डॉ. भास्करराव शिरोळे यांना विजय औटींनी शिवसेनेत नेले. यावर बोलताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) म्हणाले, मला खासदार करण्यात 50 टक्के वाटा शिवसैनिकांचा आहे. मागील तीन वर्षांत मी एकही वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या विरोधात केलेले नाही. विखे गटाचे कार्यकर्ते शिवसेनेत गेले याचे वाईट वाटले नाही. पारनेर तालुक्यात असलेल्या शिवसैनिकांवर संकट आल्यास मी त्यांच्या सोबत राहिल, माझ्यावर देवेंद्र फडणवीस व नरेंद्र मोदी यांनी कारवाई केली तरी चालेल, असे खासदार विखे यांनी पारनेर तालुक्यातील एका कार्यक्रमात काल ( ता. 11 ) सांगितले होते. या वक्तव्यावर त्यांनी आज खुलासा दिला आहे. ( Sujay Vikhe says we are with Shiv Sena ... but ... )

प्रसारमाध्यमांत खासदार डॉ. सुजय विखे यांच्या वक्तव्यावर बातम्या प्रसिद्ध झाल्यावर त्यांनी खुलासा जाहीर केला. यात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, शिवसेनेच्या संदर्भात केलेले भाष्य हे फक्त पारनेर तालुक्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर होते. मात्र त्याचा राज्याच्या राजकारणाशी संबंध जोडून विपर्यास केला गेला. जिल्ह्यात राजकीय निर्णय घेताना प्रदेश भाजप पदाधिकाऱ्यांचाच अंतिम आदेश मानला जाईल, अशी भूमिका खासदार विखे पाटील यांनी स्पष्ट केली.

Dr. Sujay Vikhe Patil
बेलवंडीचा गड अण्णासाहेब शेलारांनी राखला : राहुल जगतापांच्या मदतीने नागवडे गटाचा पराभव

त्यांनी पुढे म्हंटले आहे की, अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मला निवडून आणण्यात पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र या तालुक्याच्या बदलत्या राजकीय वातावरणात शिवसैनिकावर होत असलेला अन्याय तसेच राज्यात आघाडी सरकार असतानाही तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा होत नसलेला विचार पाहाता या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहाण्याची किंवा त्यांना बरोबर घेवून जाण्याच्या दृष्टीने आपण भाष्य केले. मात्र माझ्या वक्तव्याचा थेट राज्यातील राजकारणाशी संबंध जोडून विपर्यास केला असल्याचे त्यांनी सांगितले.

Dr. Sujay Vikhe Patil
एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने नव्हे, चुकीच्या व्यक्तीच्या येण्याने वाईट बदल घडतो

जिल्ह्यात कोणतीही राजकीय भूमिका किंवा निर्णय करताना अंतिम निर्णय हा प्रदेश आणि जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेवूनच करण्याची भूमिका आपली कायम आहे. याबाबतचा अंतिम निर्णय सुध्दा त्यांचाच असणार आहे. पारनेर तालुक्याच्या राजकीय परिस्थितीची वस्तुस्थिती आपण वरिष्ठांना देवून यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Dr. Sujay Vikhe Patil
भाजप बरोबर मनसेची पहिली युती : राष्ट्रवादीच्या ताब्यातील सोसायटीवर मिळविली सत्ता

विखे करणार पारनेरमध्ये स्थानिक आघाडी

पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी वेगळी रणनीती आखली आहे. त्यानुसार शिवसेना, काँग्रेस व भाजप या तीन पक्षांची संयुक्त आघाडी स्थापन करून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत नीलेश लंके यांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे डॉ. सुजय विखे पाटील हे पारनेर तालुक्यातील शिवसेनेच्या नेत्यांबरोबर दिसत आहेत. यातूनच त्यांनी कालच्या भाषणात शिवसेने संदर्भात वक्तव्य केले होते. मात्र त्यांचे हे वक्तव्य नवीन राजकीय वादाला तोंड तर फोडणार नाही ना, हे काळच ठरविणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com