sujay vikhe
sujay vikhe sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पारनेरमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुजय विखेंचा मोठा उपक्रम...

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर ( अहमदनगर ) : पारनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांचे प्रेम व आगामी राजकीय आडाखे लक्षात घेत केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या 'राष्ट्रीय वयोश्री' योजनेची अहमदनगर जिल्ह्यात पारनेरपासून सुरवात करण्याचा घाट खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी घातला आहे.

या योजने बाबत 'सरकारनामा'शी बोलताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, या योजने अंतर्गत नगर जिल्ह्यातील 60 वर्षे वयावरील सर्व वयोवृद्धांना मोफत सहाय्यक साधने वाटप करण्यात येणार आहे. या अभियानाची सुरवात पारनेरमधील (ता. 1 व 2 ऑक्टोबर) सेनापती बापट विद्यालयात करण्यात येणार आहे.

डॉ. विखे पुढे म्हणाले, ही योजना जिल्ह्यातील प्रत्येक गरजूपर्यंत पोहचण्यासाठी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन संचलित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र व जिल्हा समाज कल्याण विभाग विशेष प्रयत्न करत आहेत. या योजने अंतर्गत 60 वर्षे वयाच्या व वार्षिक उत्पन्न 1 लाख 80 हजार पेक्षा कमी असणाऱ्या प्रत्येक जेष्ठ नागरिकास त्यांच्या गरजेप्रमाणे नंबरचा चष्मा, काठी, श्रवण यंत्र, कृत्रिम दात, कुबड्या, वॉकर, व्हिलचेअर, गुडघ्याचा पट्टा, मानेचा, पाठीचा पट्टा, तीन चाकी सायकल आदी साहित्य मोफत देण्यात येणार आहे.

हे शिबिर दोन टप्यात होणार आहे. पहिल्या टप्यामध्ये प्रत्येक नागरिकाचे परीक्षण करण्यात येऊन त्यास कोणते साहित्य लागेल हे ठरविण्यात येईल व एक महिन्यानंतर दुसऱ्या टप्यात हे साहित्य वाटप करण्यात येईल. प्रथम टप्पा 1 ऑक्टोबर रोजी पारनेर येथून सुरवात होणार आहे. या योजनेचा जिल्ह्यातील प्रत्येक वयोवृद्धांनी फायदा घ्यावा, असे आवाहन खासदार डॉ.विखे यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT