Sunetra Pawar pays tribute to Yashwantrao Chavan at Karad Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sunetra Pawar Karad Visit: सुनेत्रा पवार प्रितीसंगमावर दाखल...यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळाला भेट; अजितदादांची 'ही' परंपरा ठेवली कायम

First official visit of Deputy CM Sunetra Pawar to Satara district: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं प्रेरणास्थान असलेल्या यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करुन आता सुनेत्रा पवार या आपल्या नव्या राजकीय पर्वाची सुरुवात करणार आहेत.

Amit Ujagare

Sunetra Pawar continues Ajit Pawar's tradition of visiting Preetisangam: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे कराड इथल्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळ असलेल्या प्रितीसंगमावर दाखल झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं प्रेरणास्थान असलेल्या यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करुन आता सुनेत्रा पवार या आपल्या नव्या राजकीय पर्वाची सुरुवात करणार आहेत.

यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार नितीन पाटील, मकरंद पाटील आणि रुपाली पाटील ठोंबरे हे देखील उपस्थित होते. यानंतर त्या फलटणमध्ये जाऊन अजित पवारांचे अंगरक्षक असलेले विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.

पवार कुटुंबियांची परंपरा कायम

प्रितीसंगमाला भेट देऊन सुनेत्रा पवार यांनी शरद पवार आणि अजित पवार यांची परंपरा कायम राखली आहे. कारण जेव्हा केव्हा महत्वाचा राजकीय निर्णय घेण्याची वेळ येते तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात महत्वाचा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा पवार कुटुंबिय हे आपले प्रेरणास्थान असलेल्या यशवंतरावांच्या चरणी नतमस्तक होत असतात.

हीच परंपरा आता सुनेत्रा पवार यांनी पुढे सुरु ठेवली आहे. शरद पवार हे यशवंतराव चव्हाणांचे राजकीय वारसदार म्हणून ओळखले जातात. त्यामुळं शरद पवारांपासून संपूर्ण पवार कुटुंबियांचा राजकीय वारसा हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारानं चालत आला आहे.

विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची घेणार भेट

दरम्यान, प्रितीसंगमावरुन सुनेत्रा पवार या रवाना झाल्या असून फलटण इथं जाऊन त्या आता अजित पवारांचे अंगरक्षक राहिलेल्या दिवंगत विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला त्याच विमानात पवारांसोबत विदीप जाधव हे देखील होते.

या अपघातात विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव, फ्लाईट अटेंडंड पिंकी माळी, मुख्य पायलट कॅप्टन सुमीत कपूर आणि सहपायलट कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT