Sunetra Pawar Phaltan Visit: बापाचं छत्र हरवलेल्या चिमुकल्यांना सुनेत्रा पवार भेटणार; उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलाच दौरा

Sunetra Pawar First Tour: दुपारी 11 वाजता त्या फलटण येथे रवाना होणार आहेत. येथे सुनेत्रा पवार या विदीप जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील आणि त्यांच्या दु:खात सहभागी होणार आहे.
Sunetra Pawar meets family of deceased PSO Vidip Jadhav
Sunetra Pawar meets family of deceased PSO Vidip JadhavSarkarnama
Published on
Updated on

Sunetra Pawar continues Ajit Dada's legacy of caring for staff: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. उपमुखमंत्री झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. या दौऱ्यात त्या बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवारांसह मृत्यूमुखी झालेल्या विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सात्वनपर भेट घेणार आहे.

सुनेत्रा पवार या कराड येथील प्रितीसंगम बाग येथे सकाळी 11 वाजता जाणार आहे. त्यानंतर त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पमाला अर्पण करून त्यांना आदरांजली वाहतील.

दुपारी 11 वाजता त्या फलटण येथे रवाना होणार आहेत. येथे सुनेत्रा पवार या विदीप जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील आणि त्यांच्या दु:खात सहभागी होणार आहे. यानंतर सुनेत्रा पवार पुन्हा बारामतीला रवाना होतील.

Sunetra Pawar meets family of deceased PSO Vidip Jadhav
Sunetra Pawar News: धाराशिवची लेक झाली बारामतीच्या 'वहिनी'; समाजकारण ते उपमुख्यमंत्री; सुनेत्रा पवारांविषयी जाणून घ्या सर्वकाही

विदीप जाधव यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मागे आई-वडील, १४ वर्षांची मुलगी आणि ९ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. अपघाताच्या वेळी त्यांचे आई-वडील मूळ गावी होते.

सुनेत्रा पवार या विदीप जाधव यांच्या दोन्ही चिमुकल्यांना भेटून त्यांचे सात्वन करणार आहेत. त्यानंतर त्या बारामतीकडे रवाना होणार आहेत. गेल्या २२ वर्षांपासून मुंबई पोलीस दलात असणाऱ्या जाधव यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या कर्तव्याचे पालन केले.

28 जानेवारीला बारामती विमानतळावर अजित पवारांचं विमान कोसळलं, ज्यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला, यामध्ये अजितदादांसोबत असलेले पोलीस सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचाही समावेश होता. विदीप जाधव हे मूळचे फलटण तालुक्यातील लोणंद, तरडगावचे रहिवासी आहेत.

Sunetra Pawar meets family of deceased PSO Vidip Jadhav
NCP Reunion: अजितदादा चार वेळा माझ्या घरी आले होते..; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी जयंत पाटलांचे मोठे विधान

विमानात अजित पवार यांच्यासह विदीप जाधव, त्यांच्या सहकारी पिंकी माळी, पायलट कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश होता. दुसऱ्यांदा धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला आणि या पाचही जणांनी जगाचा निरोप घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com