Sunil Tatkare, dhananjay munde  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sunil Tatkare : मुंडेंचा राजीनाम्यावर तटकरेंचे संकेत; म्हणाले, 'पक्ष विचार करतोय, लवकरच...'

Sunil Tatkare On local Body Election & Dhananjay Munde : सर्वोच्‍च न्‍यायालयात ओबीसी आरक्षणावरून याचिका प्रलंबित असल्‍याने स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुका रखडल्‍या आहेत. महापालिकेसह इतर स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुका होत नसल्‍याने नागरिकांना समस्‍यांचा सामना करावा लागत आहे.

Aslam Shanedivan

Pune News : जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपलिकासह महानगरपालिका निवडणूका सर्वोच्‍च न्‍यायालयात ओबीसी आरक्षणावरून याचिका प्रलंबित असल्‍याने रखडल्‍या आहेत. ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिकांना समस्‍यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुका कधी होणार अशी विचारणा आता सत्ताधाऱ्यांसह विरोधक आणि जनता करताना दिसत आहे. अशातच आज (ता. 8) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे. तटकरे यांनी स्थानीक स्वराज्य संस्था रेंगाळल्याचे म्हटलं आहे.

पुण्यात आज राष्ट्रवादीची राज्यव्यापी बैठक पार पडली. यानंतर तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, राज्यात महायुतीला चांगल यश मिळालं असून राष्ट्रवादीला अजित पवार यांच्या नेतृत्वात चांगले यश मिळाले आहे. क्रमांक दोन वर येतं आम्हाला विजय प्राप्त झाला आहे. तर या विजयात लाडकी बहीण योजना आणि महिलांचा प्रतिसाद हेच मुख्य कारण होतं.

आता आगामी स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुकांडे लक्ष द्यायचे असून पक्ष संघटन मजबूत करण आमची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यव्यापी दौरा मी करणार आहे. अजित पवार देखिल दौरे करणारं आहेत, अनेक लोक पक्ष प्रवेश करणार असल्याचे तटकरे यांनी म्हटलं आहे. सरकारच्या योजना लोकापर्यंत पोहोचवण्यासह पक्षाकडे अधिक लक्ष देणारं असल्याचे सांगताना पक्ष बांधणी करुन नव्या नियुक्त्या करण्याचे संकेत दिले आहेत.

तसेच तटकरे यांनी राज्यातील रखडलेल्या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुकांवर भाष्य केले आहे. राज्यातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुका रखडल्या असून त्या लवकरच होतील अशी शक्यता व्यक्त केली आहे.

दरम्यान तटकरे यांनी मंत्री धंनजय मुंडे यांच्यावरही वक्तव्य केलं असून अनेकदा माझ्या सह पक्षातील नेत्यांनी स्पष्ट केल आहे की देशमुख यांची हत्या निर्घृण झाली आहे. याची सखोल चौकशी व्हायला हवी. दोषी लोकांवर कठोर करवाई व्हावी अन् मास्टर माईंड शोधून काढावा. देशमुख हत्याकांडाचा तापास महत्वाचं असून तीन समित्या नेमल्या आहेत. पोलिस यंत्रणा तपास करत असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

या हत्याप्रकरणात जे आरोप झालेलं आहेत त्याची दखल सरकारने घेतली आहे. जे निर्णय येतील ते लवकर सांगू. अजित पवार सरकारचे नेतृत्व करत असून मुंडेंच्या बाबत निर्णय घेतील. पक्षाचे हित काय याचा विचार पक्ष करत आहे योग्य निर्णय लवकर घेऊ, असेही मुंडे यांच्या राजीनाम्यावर तटकरे यांनी भाष्य केलं आहे.

कृषी घोटाळा आणि पालकमंत्री

तसेच राज्यात कृषी घोटाळा झाला असून शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारला गेला आहे. यावर देखील सरकार तपास करत असल्याची माहिती तटकरे यांनी दिली आहे. तर पालकमंत्रिपदावरून देखील तटकरे यांनी स्पष्टपणे आपली बाजू मांडली आहे. रायगड आणि नाशिकवर लवकरच निर्णय घेईल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लवकरच पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेतील, असेही सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT