Sunil Tatkare Video : ‘ताईं’मुळे तटकरे लोकसभेत संतापले! म्हणाले, मला शिकवण्याची आवश्यकता नाही…

Parliament Session Lok Sabha Speech : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान सुनिल तटकरे यांचे भाषण झाले.
MP Sunil Tatkare
MP Sunil TatkareSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेतील एकमेव खासदार सुनिल तटकरे यांनी सोमवारी काँग्रेस व मित्रपक्षांवर  जोरदार हल्ला चढवला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विधानसभा निवडणुकीतील वाढलेल्या मतदारांबाबतच्या दाव्यांचाही त्यांनी समाचार घेतला. या भाषणादरम्यान तटकरेंना विरोधी बाकांवर तीनवेळा डिवचण्याचा प्रयत्न झाला. तटकरेंनी ‘ताई’ असा उल्लेख करत प्रत्युत्तरही दिले.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना तटकरे यांनी विरोधी पक्षनेत्यांचे भाषण ऐकून मनाला तीव्र वेदना झाल्या, असे म्हटले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या काळात संविधानाची कशी गळचेपी झाली, याची उदाहरणे दिली. काँग्रेसने अनेक सरकार पाडल्याचा आरोप करताना तटकरेंनी आणीबाणीचाही उल्लेख केला.

MP Sunil Tatkare
S Jaishankar News : राहुल गांधींना काही मिनिटांतच मिळाले सडेतोड उत्तर; जयशंकर यांनी सांगितले ट्रम्प शपथविधीचे सत्य...

आणीबाणीनंतर काँग्रेसचा पराभव झाला, या तटकरेंच्या विधानानंतर विरोधी बाकांवरून कुणीतरी त्यांना हटकले. त्यावर तटकरेंही लगेच संतापलेल्या स्वरात म्हणाले, त्यावेळी मी राजकारणात नव्हतो, पण जे सत्य कधी नाकारता येणार नाही. एनडीएसोबत जाण्याची भूमिका विचारपूर्वक घेतली. कारण काँग्रेसचा इतिहास पाहिल्यानंतर आम्हालाही सुध्दा वाटले.

काँग्रेसने पवारसाहेबांची काय हालत केली हे बघणारा ताई मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे काँग्रेस आणि काँग्रेसच्या नीतीबद्दल आपण मला शिकवण्याची आवश्यकता नाही. शरद पवारसाहेबांचे पुलोदचे सरकार होते. पवारसाहेबांनी संजय गांधींचे नेतृत्व नाकारले म्हणून त्यांचे सरकार बरखास्त करण्याचे पाप ताई काँग्रेस पक्षाच्या सरकारने केले. त्यामुळे त्याबद्दल आम्हाला सांगू नका, असे तटकरे म्हणाले.

MP Sunil Tatkare
Rahul Gandhi in Lok Sabha : राहुल गांधींचा UPA सरकारला घरचा आहेर; लोकसभेत कळीचा मुद्दा मांडला...

तटकरे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदान सांगितले. 2019 आणि 2024 या दोन्ही निवडणुकींच्या तुलना करत त्यांनी आपली 50 हजार मते वाढल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी विरोधी बाकांकडे पाहत त्यांनी ‘ताई नका चिंता करू’, असे म्हटले आणि आपले भाषण पुढे सुरू ठेवले. तटकरेंनी तीनवेळा ताईंचा उल्लेख केला. पण या ताई नेमक्या कोण आहेत, हे स्पष्ट झाले नाही.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीवर बोललताना तटकरे म्हणाले, जनतेने महायुतीला अभूतपूर्व यश मिळवून दिले. त्यामुळे राहुल गांधी आणि त्यांचे मित्रपक्ष या निराशेतून बाहेर पडले. पराभव होताच विरोधक ईव्हीएमवर ठपका ठेवतात, असे तटकरे म्हणाले. त्यानंतर पुन्हा एकदा विरोधी बाकांवरून काँग्रेसने तुम्हाला मोठे केले, असे एक सदस्य म्हणाले. त्याला प्रत्युत्तर देताना तटकरे म्हणाले, आम्ही आमच्या स्वत:च्या ताकदीवर मोठे झालो. आम्ही आमच्या पक्षाला त्याठिकाणी मोठे केले. तुम्ही मला शिकवण्याचा प्रयत्न करू नका, मी 40 वर्षे राजकारणात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com