Zainuddin Shaikh-Raj Thackeray
Zainuddin Shaikh-Raj Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

वसंत मोरेंना सुनावत मुस्लिम पदाधिकाऱ्याकडून राज ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : माझ्या मतदारसंघात मला शांतता हवी, असे सांगून मस्जिदीवरील भोंगे उतरविण्यासंदर्भात भूमिका घेण्यास मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी नकार दिला. मात्र, दुसरीकडे मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भोंग्यासंदर्भातील भूमिकेला सोलापुरातील (Solapur) मुस्लिम पदाधिकाऱ्याने पुढे येऊन समर्थन दिले आहे. तसेच, पक्षाचा राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनाही त्यांनी सुनावले आहे. (Support for Raj Thackeray's role from MNS Solapur city president)

मस्जिदीवरील भोंगे प्रशासनाने उतरविले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते त्यापेक्षा दुप्पट आवाज करून हनुमान चालिसा म्हणतील, असा इशारा राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यात दिला होता. त्यानंतर पक्षात दोन गट पडले होते. राज यांच्या भूमिकेला विरोध करत काही मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. तसेच पक्षाचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आपल्या राज ठाकरे यांचे भाषणच समजले नसल्याचे सांगत मस्जिदीवरील भोंगे उतरविण्यास नकार दिला होता. माझ्या मतदारसंघात मला शांतता हवी आहे. त्यामुळे हा आदेश मी पाळणार नाही, असेही मोरे यांनी स्पष्ट केले हेाते. त्यानंतर मनसेकडून मोरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची ठरत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूर शहराध्यक्ष जैनोद्दीन शेख यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेला समर्थन दिले आहे. तसेच त्यांनी पक्षाचे जे पदाधिकारी राजीनामा देत आहेत, त्यांनाही सुनावले आहे. शेख म्हणाले की राज ठाकरे यांनी नमाज पठणाला, अजान देण्यास विरोध केलेला नाही. मस्जिदीवरील भोंग्याच्या आवाजासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे जे आदेश आहेत, तीच भूमिका राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात मांडलेली आहे.

मनसेचे जे पदाधिकारी राजीनामे देत आहेत, त्यांना राज ठाकरे यांची भूमिका समजलेलीच नाही, असे दिसते, असा टोलाही मनसेचे सोलापूर शहराध्यक्ष जैनोद्दीन शेख यांनी वसंत मोरे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT