Supriya Sule Meet with Ajit Pawar News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Supriya Sule: दादांच्या उपस्थितीत बैठक घ्या, सुप्रियाताईंचे मुख्यमंत्र्यांना साकडे...

Baramati News : बारामती तालुक्यातील पाणीटंचाईबाबत दुष्काळी बैठक घेण्याची मागणी

Sudesh Mitkar

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांविरोधातील याचिकेवर जानेवारीमध्ये सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लढ्यातून काही प्रमाणात उसंत मिळाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती मतदारसंघातील प्रश्नांकडे आपला मोर्चा वळवला आहे. बारामती तालुक्यात दुष्काळ निवारण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दुष्काळी बैठक घेण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवरून केली आहे.

यंदा पाऊस कमी झाल्याने बारामती तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा आतापासूनच जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे दुष्काळी आढावा बैठक घेऊन पिण्याचे तसेच शेती आणि जनावरांच्या पाण्यासाठीचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे याबाबतीत मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून उपमुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घ्यावी, अशी मागणी सुळे यांनी केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुळात पुण्याचे पालकमंत्री पद अजित पवारांकडे असल्याने कालवा समितीची बैठक घेऊन पाण्याचे नियोजन करण्याचे पूर्ण अधिकार अजित पवारांकडे आहे. जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून अजित पवार पाण्याचे नियोजन करत असतात. त्यामुळे याबाबत बैठक घेण्याची मागणी अजित पवारांकडे न करता थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्याची मागणी केल्याने सर्वांच्याच आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

काय आहे ट्विट

बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच तालुक्यांमध्ये पाण्याचा प्रश्न हळूहळू गंभीर होत चालला आहे. यामुळे तातडीने पाण्याच्या संदर्भाने दुष्काळी आढावा बैठक घेण्याची आवश्यकता आहे. या बैठकीत पिण्याचे तसेच शेती आणि जनावरांच्या पाण्यासाठीचे नियोजन करणे आवश्यक आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी याबाबत वैयक्तिक लक्ष देऊन उपमुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत तातडीने या बैठकीचे आयोजन करावे.

(Edited by Sudesh Mitkar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT