Sanjay Raut : “तुम्ही बेकायदा सरकारचे रक्षक आहात”, राऊतांची नार्वेकरांवर आगपाखड

Sanjay Raut on Rahul Narvekar: नार्वेकरांच्या ‘त्या’वक्तव्यांवर राऊतांची टीका
Rahul Narvekar, Sanjay Raut News
Rahul Narvekar, Sanjay Raut NewsSarkarnama

Mumbai News : घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती बेकायदेशीर सरकारला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा व्यक्तींमुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढतो, असल्याचे संगात “तुम्ही बेकायदा सरकारचे रक्षक आहात”, अशी खरमरीत टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी रविवारी केलेल्या वक्तव्यांवर उत्तर देताना संजय राऊतांनी नार्वेकरांनवर टीका केली आहे. राऊत म्हणले, " राज्यांतील शेतकऱ्यांचे गेल्या 2 दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. अशा वेळी मुख्यमंत्री इतर राज्यांच्या प्रचारात गुंतले आहेत. सध्या राज्यातील शेतकऱ्याला मदतीची गरज आहे. मात्र तुम्ही तिथे तेलंगाणात जाताय, तिथे तुम्हाला कोण विचारतंय? असा सवाल त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rahul Narvekar, Sanjay Raut News
Vijay Auti vs Nilesh Lanke : 'तुमचा पक्षच अस्तित्वात कुठे'; विजय औटींनी अजित पवार गटाच्या नेत्यांना डिवचलं !

नार्वेकर काय म्हणाले होते ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युगपुरुष असल्याचे विधान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले होते, यावर पबोलताना राऊत म्हणाले, कोण पुरुष आहे, कोण युगपुरुष आहे, कोण महापुरुष आहे हे जनता ठरवेल. सत्ताधारी जर पुरुष असते तर जम्मू कश्मीरात रोज जवानांच्या हत्या झाली नसती. लडाखमध्ये चीन आत घुसला नसता.

नार्वेकर काय म्हणाले होते ?

सरकार पडणे किंवा टिकणं बहुमतावर अवलंबून असते. “सरकार पडणं किंवा टिकणं हे फक्त सभागृहातल्या बहुमतावर अवलंबून आहे. त्यामुळे कुणी काही भविष्यवाणी केली, तर त्याकडे लक्ष देणं तितके गरजेचे नाही. सरकारकडे संख्याबळ असल्यास ते सरकार टिकत आणि संख्याबळ फक्त विधानसभेत मांडता येत. त्यामुळे विधानसभेत बहुमत नसल्यास , सरकार कस कोसळू शकेल”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

(Edited by Sudesh Mitkar)

Rahul Narvekar, Sanjay Raut News
NCP Crisis : तब्बल 260 पानांचं उत्तर, अजित पवार गटाचा पुन्हा 'राष्ट्रवादी'वर दावा, म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com