Ashok Chavan, Sushilkumar Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ashok Chavan : 82 वर्षांच्या सुशीलकुमार शिंदेंचा अशोक चव्हाणांना इशारा; म्हणाले, 'जे राहिले ते लढले अन्...'

Sushilkumar Shinde : काँग्रेसमध्ये मोठे खिंडार पडण्याची शक्यता

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : काँग्रेसचे एकनिष्ठ समजले जाणारे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आता चव्हाण यांच्यासोबत नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे तीन आमदार असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे हे चारही आमदार नॉट रिचेबल असून, ते चव्हाणांसोबत मुंबईत असल्याचे समजते. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी पक्ष सोडणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.

नॉट रिचेबल झाल्यानंतर चव्हाण (Ashok Chavan) हे भाजपत जाणार असल्याचे निश्चित झाल्याची माहिती आहे. त्यांच्यासोबत नांदेड जिल्ह्यातील आमदार माधवराव जवळगावकर, मोहन हंबर्डे, जितेश अंतापूरकर हे चार आमदार आहेत. विधान परिषदेचे माजी आमदार अमर राजूरकर हेसुद्धा त्यांच्यासमवेत आहेत. काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात असला तरी ८२ वर्षांचे सुशीलकुमार शिंदेंनी मात्र संबंधितांना जनता धडा शिकवेल, असा इशारा दिला.

सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) म्हणाले, काँग्रेसमधून मातब्बर लोक बाहेर पडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अशा घटना काँग्रेसने पाहिल्या आहेत. इंडिया शायनिंगच्या वेळेसही मोठ्या संख्येने काँग्रेसमधून लोक गेले होते. त्यावेळीही पक्षात जे राहिले ते जिद्दीने लढले होते. त्यावेळेस आमचेच सरकार आले होते. आताही असंच काहीसे होईल, असा दाखला देत शिंदेंनी अशोक चव्हाणांसह त्यांच्यासोबत जाणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे इशाराच दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, खुद्द अशोक चव्हाणांनी ट्विट करत त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती दिली. ते म्हणाले, मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा सोमवारी, दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी दिला आहे. हा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आहे.'

अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राज्यासह देशात खळबळ उडाली. ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या चर्चेमुळे काँग्रेस पक्षात भूकंप झाला आहे. यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी तातडीने दिल्ली गाठली. यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT