Sushilkumar Shinde
Sushilkumar Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

हिजाब, ‘काश्मीर फाईल्स’वर सुशीलकुमार शिंदेंचे महत्वपूर्ण भाष्य

विश्वभूषण लिमये

सोलापूर : हिजाब आणि काश्मीर फाईल्स या मुद्द्यांचा राजसत्तेवर असणाऱ्यांनी प्रपोगंडा केला आहे, त्यापेक्षा ‘गुजरात फाईल्स’ही एकदा वाचून बघावं, असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी केले. (Sushilkumar Shinde's important commentary on Hijab &'Kashmir Files')

गेल्या काही दिवसांपासून देशात हिजाब आणि काश्मीर फाईल्सवरून जोरदार राजकारण रंगलं आहे. यामधून चित्रपटसृष्टीही सुटू शकली नाही. कधी नव्हे ते चित्रपटसृष्टीमध्ये या चित्रपटावरून दोन गट पडले आहेत. त्यातच आता माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनीही या विषयावर महत्वपूर्ण भाष्य केले. शिंदे हे सध्या सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्याचवेळी त्यांनी ‘काश्मीर फाईल्स’बाबत विधान केले आहे.

हिजाब हा विषय नवीन नाही, तो जुनाच आहे. पण, ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या प्रचारादरम्यानच हा मुद्दा पुढे का केला जातो आहे. ‘काश्मीर फाईल्स’पेक्षा ‘गुजरात फाईल्स’ एकदा वाचून बघावे. राजसत्तेवर असणाऱ्यांनी याचा प्रपोगंडा करावा, याचा शोध त्यांनीच करावा, असं विधानही माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी केले.

देशात सध्या महत्वाचे मुद्दे, जगण्या मरण्याचे प्रश्न बाजूला पाडले जात आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नावर चर्चा होण्याऐवजी हिजाब, काश्मीर फाईल्स, गुजरात फाईल्स हे मुद्दे जास्त चर्चिले जात आहेत. भाजपकडून काश्मीर फाईल्स चित्रपटाला पाठिंबा दिला जात आहे, तर विरोधकांकडून त्याचा प्रतिवाद केला जात आहे.

‘हिजाब’वरूनही देशाच्या काही भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. कर्नाटकतही तर काही दिवस शाळा-महाविद्यालये बंद ठेवावी लागली होती. या सर्व पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विधानाला महत्व प्राप्त झालं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT