Sushilkumar Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sushilkumar Shinde's Uturn : सुशीलकुमार शिंदेंच्या मनात नेमकं काय?; राजकीय निवृत्तीवरून एका दिवसात ‘यू टर्न’

Congress Leader News : मी आता राजकारणातून निवृत्त झालो. पण, मला जे करता येईल, ती मदत मी करणार, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले होते.

Vijaykumar Dudhale

Solapur News : राजकारणातील निवृत्तीच्या विधानावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी दुसऱ्याच दिवशी ‘यू टर्न’ घेतला आहे. मी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे, असे जाहीर विधान शिंदे यांनी केले होते. त्याच्या उलट विधान त्यांनी एकाच दिवसात केले आहे, त्यामुळे शिंदेंच्या मनात नेमकं काय चालू आहे, असा चर्चा रंगली आहे. (Sushilkumar Shinde's 'U-turn' from political retirement in a day)

धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘मी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे, त्यामुळे आगामी सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी आमदार प्रणिती शिंदे याच काँग्रेसच्या उमेदवार असतील असं जाहीर केलं होतं. त्यानंतर एकाच दिवसात शिंदे आपल्या विधानावरून माघारी फिरले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात ‘माणूस कधीच निवृत्त होत नसतो. मी राजकारणातून निवृत्त होणार नसून सक्रियच राहणार आहे. सोलापूर लोकसभेच्या जागेसाठी प्रणिती शिंदे यांचे मी फक्त नाव सूचविले. मी राजकारणात सक्रियच आहे,’ असे सांगत शिंदे यांनी आपल्याच आदल्या दिवशीच्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतला आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आमदार प्रणिती शिंदे याच काँग्रेसच्या उमेदवार असतील. मी आता राजकारणातून निवृत्त झालो. पण, मला जे करता येईल, ती मदत मी करणार, असंही सुशीलकुमार शिंदे म्हणाले होते. शिंदे मात्र त्या विधानावरून मागे फिरले आहेत. मागच्या निवडणुकीच्या वेळीही शिंदे यांनी सुरुवातीला लढण्यास नकार दिला होता. मात्र, नाही नाही म्हणत शिंदे यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यामुळे शिंदे हे आता प्रणिती शिंदे यांचे नाव सांगत असले तरी ऐनवेळी सुशीलकुमार शिंदे हे लोकसभेच्या आखाड्यात उतरल्यास नवल वाटू नये.

दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीचे सुधीर खरटमल यांनी ‘शरद पवार यांनी मला सोलापूर लोकसभेबाबत शब्द दिला आहे’ असे सांगून लोकसभा निवडणुकीबाबत पुन्हा दंड थोपटले आहेत. तत्पूर्वी आमदार रोहित पवार आणि प्रणिती शिंदे यांच्यात सोलापूर लोकसभेवरून शाब्दिक चकमक झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT