Modi in Shirdi : मोदींना काळे झेंडे दाखविण्यास निघालेले शिवसैनिक, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ठेवले डांबून

Nilwande Dam News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी दौऱ्यात आरक्षणावर भूमिका व्यक्त करावी, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत होती.
shivsainik-Sambhaji brigade
shivsainik-Sambhaji brigade Sarkarnama

Nagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमास्थळी काळे झेंडे दाखवण्यासाठी निघालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले. शिर्डीच्या काकडी विमानतळाजवळ ही कारवाई करण्यात आली. (PM Narendra Modi in Shridi : Police detained eight people who went to show black flags to Modi)

शिवसेना ठाकरे गटाचे नगर उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, संभाजी ब्रिगेडचे नगर जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, गौरव ढोणे, बंटी भिंगारदिवे, मयूर जेधे, भगवान कोकणे, अभी मेढे, अरुण रोडे यांना शिर्डीत अडीच वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या आठ जणांना शिर्डी पोलिसांनी कार्यक्रम संपेपर्यंत ठाण्यात बसवून ठेवले हेाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

shivsainik-Sambhaji brigade
PM Modi Shirdi Visit : 'नगर माझे आजोळ; गेली ५३ वर्षांत राज्यकर्त्यांनी निळवंडेच्या कामाचे नुसते नारळ फोडले'

आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी दौऱ्यात आरक्षणावर भूमिका व्यक्त करावी, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत होती. आरक्षणावर भूमिका व्यक्त न केल्यास रोषाला सामोरे जावे लागले, असा इशारा देण्यात आला होता, पण मोदी यांनी मराठा आरक्षणावर शिर्डीत चकार शब्दही काढला नाही. त्यामुळे मराठा समाजात नाराजीची भावना आहे.

वाढत्या महागाईसंदर्भात काळे झेंडे दाखवण्यासाठी, मराठा आरक्षणावर भूमिका मांडावी आणि मनोज जरांगे यांच्याशी मराठा आरक्षणावर बोलावे, यासाठी हे आंदोलक नगरहून शिर्डीला गेले होते. पोलिसांना हे आंदोलक शिर्डी येत असल्याचा माहिती मिळाल्यावर त्यांनी आंदोलकांना ताब्यात घेतले होते.

shivsainik-Sambhaji brigade
Gunaratna Sadavarte News : ST आंदोलन 'हायजॅक', मराठा आरक्षणाला कडाडून विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते कोण...?

दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळमुक्तीसाठी आशीर्वाद द्या, असे आवाहन जनतेला केले. निळवंडे धरण प्रकल्प माझ्या जन्माअगोदर सुरू झाला होता. त्याचे लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. या प्रकल्पासाठी मंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी खूप मेहनत घेतली. केंद्र सरकारने गेल्या नऊ वर्षांत महाराष्ट्राला 30 हजार कोटी रुपये सिंचन क्षेत्राला दिले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील ५० टक्के भागात पाऊस नसतो. त्यामुळे तिथे दुष्काळ असतो. तिथे पाणी पोचवल्यास महाराष्ट्र आत्महत्यामुक्त होईल. गोदावरीचे पाणी दक्षिणकडे वळवण्याचा प्रकल्प तयार आहे. यामुळे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल. त्यासाठी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशीर्वाद द्यावेत, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.

shivsainik-Sambhaji brigade
Gram Panchayat election : नारायण पाटलांच्या चिरंजीवाचे वडिलांच्या पावलावर पाऊल; सरपंचपदाच्या निवडणुकीपासून राजकीय श्रीगणेशा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com