Sushma Andhare कोल्हापूर : शिवसेनेतील फुटीनंतर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी तीन महिन्यांपुर्वी ठाकरे गटात प्रवेश केला. तेव्हापासून त्यांनी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्य सरकारमधील मंत्र्यांना सळो की पळो करुन सोडलं आहे. त्यावर त्यांना शह देण्यासाठी शिंदे सरकारने अंधारे यांचे पती वैजनाथ वाघमारे यांना त्यांच्या गटात सामील करुन घेतले. दरम्यान, सुषमा अंधारे या कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आपण शिवबंधन तोडण्यास तयार असल्याचं अंधारे यांनी म्हटलं आहे.
शिवबंधन सोडून मी किरीट भाऊंच्या नावाने गंडा बांधते. पण आमदार सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अधिश बंगला का तोडला नाही? याचं आधी उत्तर द्यावं. असं त्यांनी म्हटलं आहे. खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नातील मेंहदीवाला, पार्लर वाला, टेलरच्या चौकश्या केल्या, पण जो पक्षाचे रजिस्ट्रेशनही झालेले नाही,ज्याचं बॅंकेत खातंही उघडलं नाही, त्या पक्षाचा बीकेसीवर जो भव्य दसरा मेळावा झाला, त्यासाठी कोणाच्या खात्यातल्या पैशांचा चुराडा केला. यांच आधी किरीट सोमय्यांनी उत्तर द्यावं... असे सवाल सुषमा अधारे यांनी केले आहेत.
भाजपमध्ये गेल्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांवरची कारवाई थांबते. भाजपकडे असं कोणतं वॉशिंगमशीन आहे, हे एकदा भाजपनं स्पष्ट करावं, असं आव्हानच सुषमा अंधारे यांनी दिलं आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.ं
भाजप कपटी कारस्थानी असून त्यांनी द्वेषमूलक राजकारण सुरू केलं. हे राजकारण संपून सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. याचवेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेही उत्तर दिलं आहे. आम्हाला उमेदवार मिळो न मिळो तो आमचा प्रश्न आहे. तुम्हाला तर आनंद झाला पाहिजे. पण 40 आमदार आम्हाला सोडून गेले असले तरी पुन्हा चाळीस आमदार निवडून आणण्याच ताकद आमच्यात आहे. खासदार संजय राऊत तर म्हणाले आहेत 103 दिवस मी आत होतो 103 आमदार निवडून आणणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. येणाऱ्या काळात हातकणंगलेमधून सुजीत पिचकर ठाकरे गटाचे आमदार असतील आणि ते निवडूण आणण्याची जबाबदारी आमची असेल, असा विश्वास सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.