Gujarat Election :आप'च्या उमेदवार कांचन जरीवाला यांचे अपहरण ; सिसोदिया यांचा भाजपवर गंभीर आरोप

Gujarat Assembly Election 2022 : जरीवाला या काल शेवटी आरओ ऑफिसमध्ये दिसल्या होत्या.
Gujarat Assembly Election 2022 | Manish Sisodia
Gujarat Assembly Election 2022 | Manish Sisodia
Published on
Updated on

Gujarat Assembly Election 2022 : गुजरातमधील विधानसभा निवडणुकी पार्श्वभूमीवर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आम आदमी पक्षाने पक्षाच्या सुरतमधील उमेदवार कांचन जरीवाला यांचे अपहरण करण्यात आल्याचा दावा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी केला आहे. यामुळे गुजरातमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

भाजपने गुजरातमधील सूरत (पूर्व) येथून आमच्या उमेदवार कांचन जरीवाला यांचे अपहरण केल्याचा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे. जरीवाला या काल शेवटी आरओ ऑफिसमध्ये दिसल्या होत्या. त्यावेळी त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. नंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप सिसोदिया यांनी केला आहेत. या घटनेमुळे आता निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Gujarat Assembly Election 2022 | Manish Sisodia
Nawab Malik : नवाब मलिकांच्या अडचणी कमी होईना ; आणखी एक गुन्हा दाखल..

दरम्यान, मी मुख्य निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. मी निवडणूक आयोगाला विनंती करणार आहे की, हे अपहरण केवळ आम आदमी पक्षाच्या उमेदवाराचे झालेले नाही, हे लोकशाहीचे अपहरण असल्याचेही सिसोदिया यांनी म्हटले आहे.

दरम्यान, यापूर्वी राज्यसभा खासदार संजय सिंह यांनीही असाच दावा केला होता. गुजरातमध्ये निवडणुका तोंडावर आलेल्या असताना जरीवाला अचानक गायब होणे हा लोकशाहीचा खुलेआम गळा घोटला जात आहे, असे ट्विट त्यांनी केले. सुरत पूर्वच्या उमेदवार कांचन जरीवाला कालपासून बेपत्ता आहेत. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये उपस्थित असलेले लोक भाजपचे असल्याचाही दावा आपकडून करण्यात आला आहे. तसेच, याप्रकरणी कारवाई करून उमेदवाराचा शोध घेता येऊ शकतो. भाजपने निवडणुकीपूर्वी पराभव स्वीकारला, आता उमेदवारांचे अपहरण करत आहे, असे म्हणत सिंह यांनी भाजपवर टीकाही केली आहे.

तसेच भाजपचे लोक निवडणूक कार्यालयात येतात, आप उमेदवार कांचन जरीवाला यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याचा प्रयत्न करतात, ते शक्य नसेल तर ते त्यांना घेऊन जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसेच, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांची कामे जनतेपर्यंत पोहचवत असताना भाजप मात्र आप उमेदवारांचे अपहरण करत असल्याचेही संजय सिंह यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com