Dhairyasheel Mohite Patil- Chandrashekhar Bawankule-Ranjitshinh Naik Nimbalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha Election : माढ्याच्या उमेदवारीचा सस्पेन्स आणखी वाढला; निंबाळकर, मोहिते पाटलांनी लावली जोरदार 'फिल्डिंग'

Political News : येथील उमेदवारीवरुन भाजपमध्ये सरळसरळ दोन गट पडले आहेत.

Sachin Waghmare

भारत नागणे

Madha News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. माढा लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून तिढा आणखी वाढला आहे. येथील उमेदवारीवरुन भाजपमध्ये सरळसरळ दोन गट पडले आहेत. विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारी देण्याचा अधिकारी पार्लमेंटरी बोर्डाला असल्याचे सांगत माढ्याच्या उमेदवारीचा सस्पेन्स आणखी वाढला आहे. त्यामुळे आता येत्या काळात भाजपची उमेदवारी कॊणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा मतदारसंघात गेल्या 40 वर्षात जेवढा विकास झाला नाही तेवढा पाच वर्षात विकास केल्याचा दावा करत त्यांनी उमेदवारीवर हक्क सांगितला आहे. तर दुसरीकडे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे भाजपचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील यांनी ही माढ्यातून उमेदवारी मिळावी, अशी पक्षाकडे मागणी केली आहे. त्यामुळे माढ्यातील उमेदवारीचा तिढा वाढला आहे.

पक्ष कोणाला ही उमेदवारी देवू शकतो किंवा कोणालाही थांबवू शकतो. विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांची (Ranjeet Nimbalakar) कोणी प्रशंसा केली म्हणून पक्ष त्यांना उमेदवारी देईल असे होत नाही. मी स्वतः 15 वर्षे आमदार आणि पाच वर्षे ऊर्जा मंत्री म्हणून चांगले काम केले होते, तरीही पक्षाने मला गेल्या विधानसभा निवडणुकीत थांबवले होते, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

बावनकुळेनी दिला सूचक इशारा

पंढरपूर येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांना माढ्याच्या उमेदवारीबाबत विचारले असता ते बोलत होते. खासदार निंबाळकरांचे थेट नाव न घेता उमेदवारी देण्याचा निर्णयावरुन घेतला जातो. पक्ष कोणाला ही थांबवू शकतो, कोणालाही उमेदवारी देऊ शकतो, असे सांगत त्यांनी दोन्ही नेत्यांना सूचक इशारा दिला. माढ्यात उमेदवारीवरून कोणताही तिढा नाही. तो फक्त वरुन दिसतोय. मतभेद आहेत पण मनभेद नाहीत, असा दावा ही त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोघांच्या समर्थकांमध्ये उमेदवारीवरुन सोशल मीडिया वॉर

काही दिवसापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule ) यांनी माढ्याचे भाजपचे विद्यामान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामाचे कौतुक करत पुन्हा त्यांनाच उमेदवारी मिळेल, असे संकेत दिले होते. त्यानंतर मोहिते पाटील समर्थकांमध्ये खळबळ उडाली होती. बावनकुळेंच्या या संकेतानंतर ही धैर्यशील मोहिते पाटील (mohite patil) यांनी भाजपची उमेदवारी शंभर टक्के मलाच मिळेल असा दावा केला होता. त्यानंतर मोहिते पाटील समर्थकांनी आमचं ठरलय या टॅगलाईनखाली भावी खासदार धैर्यशील मोहिते असे बॅनर लावले आहेत. सध्या निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात समर्थकांमध्ये उमेदवारीवरुन सोशल मीडियावर वॉर रंगले आहे.

दोन्ही नेत्यामधील दुरावा कायम

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे माळशिरस येथे आल्यानंतर खासदार निंबाळकर गटाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले होते. तर अकलूज येथे मोहिते पाटील यांच्याकडून बावनकुळे यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर सुपर वॉरियर्स बैठक झाली. त्या बैठकीला मोहिते पाटील आणि खासदार निंबाळकर एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. त्यावेळी दोन्ही नेत्यामध्ये असलेला दुरावा कायम होता.

(Edited by - Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT