Madha Loksabha : मोहिते पाटील-निंबाळकरांमध्ये मतभेद असतील; पण त्यांना पक्षाचे ऐकावेच लागेल; बावनकुळेंनी सांगितला तोडगा

कुठं अन्याय झाला असेल तर तो दूर करता येतो. मात्र, दोघेही समोरासमोर उभे ठाकतील, इतके मतभेद त्या दोघांमध्ये नक्कीच नाहीत.
Mohite Patil-r Bawankule)-Nimbalkar
Mohite Patil-r Bawankule)-Nimbalkar Sarkarnama
Published on
Updated on

Solapur BJP News : माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात काही प्रश्नावरून मतभेद असतील. मात्र, आमचे केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्व बसून त्यावर तोडगा काढेल. एका विशिष्ट पातळीवर दोघांना पक्षाचे आणि नेतृत्वाचे ऐकावे लागेल, असा समजुतीचा मार्ग काढण्याचा आशावाद भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. (Mohite Patil-Nimbalkar will have to listen to the party: Chandrashekhar Bawankule)

माढा मतदारसंघात मोहिते पाटील हे बडे प्रस्थ आहेत. मागील निवडणुकीत माळशिरसमधून एक लाखापेक्षा जास्त मतांचे अधिक्य मिळाल्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय सोपा झाला होता. मात्र, निवडणुकीनंतर निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात मतभेद असल्याचे समोर आले आहे. सध्या तर त्यांच्यात संवादही नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. त्याबाबत सरकारनामाशी बोलताना बावनकुळे यांनी तोडगा निघेल, असे म्हटले आहे.

Mohite Patil-r Bawankule)-Nimbalkar
Satara VidhanSabha survey : पृथ्वीराजबाबा, शंभूराज, जयकुमार गोरे पराभवाच्या छायेत; साताऱ्यात शिंदे गट, काँग्रेसला झटका

बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, मोहिते पाटील (Mohite Patil) आणि नाईक निंबाळकर (Ranjitsinha Naik Nimbalkar) यांच्यात थोडे मतभेद असतील. त्यावर आमचे केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्व असे आम्ही सर्वजण मिळून मार्ग काढू. शेवटी एका विशिष्ट पातळीवर पक्षाचं आणि नेतृत्वाचं ऐकावं लागतं. कुठं अन्याय झाला असेल तर तो दूर करता येतो. मात्र, दोघेही समोरासमोर उभे ठाकतील, इतके मतभेद त्या दोघांमध्ये नक्कीच नाहीत.

Mohite Patil-r Bawankule)-Nimbalkar
Solapur VidhanSabha Survey : सोलापुरात भाजपला पाच, तर राष्ट्रवादीला तीन जागा; शहाजीबापूंची दांडी गुल होणार, सोपलांना पुन्हा लॉटरी

आमचे केंद्रीय नेतृत्व जेव्हा बसेल, तेव्हा मोहिते पाटील यांचे दोन प्रश्न आणि निंबाळकरांचे दोन प्रश्न असतील. त्या दोन-चार प्रश्नांचे निकाल काढता येतात. त्यामुळे माढ्यात काय अटीतटीचे मतभेद नाहीत. त्या दोघांमधून मार्ग नक्कीच निघेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Mohite Patil-r Bawankule)-Nimbalkar
Western Maharashtra Survey: पश्चिम महाराष्ट्रात भाजप-राष्ट्रवादीत काँटे टक्कर; बडे नेते ‘डेंजर झोन’मध्ये; धक्कादायक निकाल लागणार

दरम्यान, नाईक निंबाळकर यांनी मागील काही दिवसांपासून वेगळ्या पद्धतीने मतदारसंघात फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी बबनदादा शिंदे यांना भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या दिल्लीत गाठीभेटीही झाल्या होत्या. मात्र, ते प्रयत्न पूर्ण होऊ शकलेला नाही. तसेच, अवघ्या आठवडाभरापूर्वीही त्यांनी मोहिते पाटील यांचे कट्ठर विरोधक उत्तमराव जानकर यांच्या भेटीला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना नेले होते. विशेष म्हणजे त्यावेळी मोहिते पाटील हे बाहेर थांबले होते. त्यामुळे मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद असल्याचे सांगितले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com