Swabhimani Shetkari Sanghatna :  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Swabhimani Sanghatna : गेल्या वर्षीच्या गळिताच्या दुसऱ्या हप्त्यासाठी 'स्वाभिमानी' आक्रमक; साखर सहसंचालक कार्यालयातच ठिय्या !

Swabhimani Shetkari Sanghatna : गेल्या वर्षभरात साखरेचे दर हे क्विंटलला ३१०० रुपयांवरून ३८०० रुपयांपर्यंत गेलेले आहेत.

राजेंद्र त्रिमुखे

Nagar Politics : गळीत हंगाम जसा जवळ येत असताना यंदा विविध कारणांनी उसाचा तुटवडा कारखान्यांना भासण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे मागील वर्षीच्या गळीत हंगामातील 300 रुपयांचा दुसरा हप्ता काही कारखान्यांनी अद्यापही दिला नसल्याने शेतकरी संघटना आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या वतीने नगर येथील साखर सहसंचालक कार्यालयामध्ये जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करण्यात आले.

२०२१-२२ च्या गळीप हंगामातील उसाचा दुसरा हप्ता तीनशे रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित रक्कम जमा करावी. यासाठी शेवगाव, पाथर्डी तालुक्यांतील स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अहमदनगर येथील साखर सहसंचालक कार्यालयामध्ये सुमारे सहा तास ठिय्या आंदोलन केले. या वेळी निर्णय झाल्याशिवाय कार्यालयाच्या बाहेर पडायचं नाही, असा ठाम निर्धार कार्यकर्त्यांनी केल्याने प्रशासनाची मोठी धांदल उडताना दिसली.

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

या वेळी स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्ह्याचे पक्ष अध्यक्ष राऊसाहेब लवांडे, शेवगाव उपाध्यक्ष हरिभाऊ कबाड्डी इत्यादी पदाधिकाऱ्यांनी साखर सहसंचालक कार्यालयामध्ये ठिय्या दिला. स्वाभिमानी पक्षाच्या वतीने या वेळी मागील वर्षी गेलेल्या उसाला प्रतिटन तीनशे रुपये वाढीव हप्ता मिळावा, शेतकऱ्यांच्या एफआरपीमधून घुले कारखान्याने कपात केलेले १०९ रुपये, तर वृद्धेश्वर कारखान्याने कपात केलेले १२५ रुपये त्वरित शेतकऱ्यांना द्यावेत, यासह विविध मागण्यांचे निवेदन साखर सहसंचालक यांना देण्यात आले.

वाढीव दराचा फायदा सभासदांना व्हावा :

गेल्या वर्षभरात साखरेचे दर हे क्विंटरला ३१०० रुपयांवरून ३८०० रुपयांपर्यंत गेलेले आहेत. बगॅसचे दर प्रतिज्ञानाला ‌‌ २००० रुपयांवरून ४५०० रुपयांपर्यंत गेलेले आहेत. मळीचे दर हे प्रतिटन ५५०० वरून ९५०० पर्यंत गेलेले आहेत. अशा सर्व वाढलेल्या किमतीचा सभासदांना या वाढीव दरांचा फायदा मिळावा, अशी मागणी स्वाभिमानीचे बाळासाहेब फटांगडे यांनी केली.

Edited By-Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT