Raju Shetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju shetty : लोकसभेनंतर राजू शेट्टी विधानसभेच्या मैदानात, ' या' मतदारसंघातून लढणार असल्याच्या चर्चा

Assembly Election Raju shetty shirol Constituency : राजू शेट्टी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर तिसऱ्या आघाडीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यावेळी विधानसभा उमेदवार म्हणून लढवायची की नाही, याचा निर्णय राजू शेट्टी घेतील.

Roshan More

Raju shetty News : शेतकरी नेते राजू शेट्टी लोकसभेनंतर विधानसभेसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारी असल्याच्या चर्चा आहे. लोकसभेतील पराभव विसरत विधानसभा निवडणूक लढण्यासाठी शेट्टी सज्ज असल्याचे सांगितले जाते.

लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांना सलग दोन वेळा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे ते यंदा विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिरोळ विधानसभा मतदारसंघ हा मतदरासंघ राजू शेट्टींचा बालेकिल्ला समजला जातो. याच विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विधानसभा सदस्य पद मिळवले होतं. पुन्हा एकदा शिरोळच्या मैदानावर शेट्टी उतरणार असून त्या संदर्भात कार्यकर्त्यांची बैठक दोन दिवसांपूर्वी पार पडली . तिसऱ्या आघाडीचा निर्णय झाल्यानंतर शिरोळ मतदारसंघातून शेट्टी स्वतः उतरणार की आपल्या कार्यकर्त्याला तिकीट देणार हे लवकरच जाहीर करतील.

स्वाभिमानी शेतकरी संघटना चळवळ टिकवून ठेवण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या समोर मोठे आव्हान बनले आहे. अशातच लोकसभा निवडणुकीतील सलग दोन पराभवामुळे संघटनेतील कार्यकर्त्यांचे मनोबल ढासळत आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शेट्टी राज्यभर दौरे काढत आहेकत.

शेतकरी आणि शेती विरोधी काम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर पायबंद घालण्यासाठी शेतकरी चेहरा सत्तास्थानी आवश्यक आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर राजू शेट्टी हे स्वतः शिरोळ विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूकीसाठी उतरण्याची तयारी करत आहेत. त्याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

उद्या (ता.27) मंगळवारी पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि माजी खासदार शेट्टी यांची तिसऱ्या आघाडी संदर्भात बैठक होणार आहे. तिसऱ्या आघाडीचा निर्णय यशस्वी झाल्यानंतर शिरोळ विधानसभा मतदारसंघातून कोण उतरणार यावर संघटनेमध्ये विचार विनिमय होणार आहे. जर शेट्टी यांच्या नावाचा पर्याय पुढे आल्यास स्वतः राजू शेट्टी शिरोळच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT