Rohit Pawar : कंगना रनौतच्या वक्तव्यावर संजय राऊत, रोहित पवार भडकले, भाजपने तर पत्रक काढले

Sanjay Raut, Rohit Pawar Kangan Ranaut : शेतकरी आंदोलनात अत्याचार झाले, असे त्या म्हणत असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणी पोलिसांनी कंगनाचं स्टेटमेंट घेतलं पाहिजे. संसदेत यावर चर्चा व्हायला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.
Rohit  Pawar  Kangan Ranaut Sanjay Raut
Rohit Pawar Kangan Ranaut Sanjay Raut sarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar News : भाजप खासदार कंगना रनौत यांनी एका मुलाखतीमध्ये शेतकरी आंदोलना दरम्यान महिलांवर बलात्कार झाले. सरकारने कठोर पाऊल न उचलले तर बांगलादेशप्रमाणे स्थिती निर्माण झाली असती, असे वक्तव्य केले. कंगना यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत.

आमदार रोहित पवार, खासदार संजय राऊत यांनी कंगनाच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. रोहित पवार म्हणाले, ज्या विषयी माहिती नाही त्याबद्दल तुम्ही कसे बोलू शकता?

'त्या कलाकार आहेत. त्यांना राजकारणाचे काय माहीत. त्या सध्या खासदार झाल्या आहेत.मी कंगना रणौत यांच्या स्टेटमेंटचा निषेध करतो आणि सरकार आणि भाजपने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मी मागणी करतो.', असे रोहित पवार म्हणाले.

Rohit  Pawar  Kangan Ranaut Sanjay Raut
SambhajiRaje News : शिवरायांचा पुतळा कोसळल्याने संभाजीराजेंचा संताप; म्हणाले,'...यासारखी दुर्दैवी बाब नाही!'

संजय राऊत म्हणाले, कंगनाला फार गांभीर्याने घेऊ नका. आम्ही तिला गांभीर्याने घेत नाही. पण शेतकरी आंदोलनात अत्याचार झाले असे त्या म्हणत असतील तर त्यांची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणी पोलिसांनी कंगनाचं स्टेटमेंट घेतलं पाहिजे. संसदेत यावर चर्चा व्हायला पाहिजे.

भाजपने पत्रक काढले

कंगनाच्या वक्तव्यामुळे विरोधी पक्ष टीका करत असताना भाजपने देखील कंगनाच्या वक्तव्यापासून हात झटकले आहेत. भाजपने पत्रक काढत कंगनाच्या वक्तव्याचे पक्षाशी काही संबंध नाही. ते कंगना यांचे वैयक्तिक मत आहे. भाजप त्याच्याशी सहमत नाही. कोणत्याही विषयावर त्यांना बोलण्याची पक्षाकडून अधिकृत परवानगी देण्यात आली नाही. कंगनाने असं वक्तव्य पुन्हा करू नये अशी सक्त ताकीद देखील भाजपकडून देण्यात आली आहे.

Rohit  Pawar  Kangan Ranaut Sanjay Raut
Prashant Kishor : प्रशांत किशोर यांच्या पत्नी पहिल्यांदाच राजकीय मंचावर; अशा जुळल्या होत्या रेशीमगाठी?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com