Ravikant Tupkar, Raju Shetty  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetty Slams Ravikant Tupkar : 'स्वाभिमानी' हायजॅक करणे इतकं सोपं नाही ; शेट्टींनी तुपकरांना धुडकावलं

Swabhimani Shetkari Sanghatana : बैठकीमध्ये तुपकरांनी बोलावे..

सरकारनामा ब्यूरो

Swabhimani Shetkari Sanghatana News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी आणि पक्षातील आक्रमक नेते रविकांत तुपकर यांच्यातील वाद वाढतच आहे. राजू शेट्टींवर नाराज असलेल्या तुपकरांनी माध्यमांसमोर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे 'स्वाभिमानी' फूटणार का,असा प्रश्न विचारण्यात येत आहे. तुपकरांच्या आरोपांवर राजू शेट्टींनी सडेतोड उत्तर देत त्यांना धुडकावले आहे.

राजू शेट्टी आज (शनिवारी) विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी तुपकरांविषयी भूमिका मांडली. "रविकांत तुपकर यांनी माध्यमांसमोर न बोलता आठ ऑगस्टला शिस्त पालन समितीची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये तुपकरांनी बोलावे. त्यांच्या शंकेचे निरसन करावे. 'स्वाभिमानी' हायजॅक करणे इतकं सोपं नाही," अशा शब्दात शेट्टींनी तुपकरांना फटकारले.

दोन दिवसापूवी तुपकरांनी पक्षाच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली होती. "संघटना ही कुणाची खासगी मालमत्ता नाही, संघटना कार्यकर्त्यांच्या ताकदीवर उभी राहिली, त्यामुळे संघटना सगळ्या कार्यकर्त्यांची आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर मी कुणाशीही खेटायला तयार आहे," असा इशारा तुपकरांनी दिला होता.

"नेतृत्वाने कार्यकर्त्यांचे पंख छाटू नयेत, परंतु नेतृत्वच जर कार्यकर्त्यांचे पंख छाटत असतील, तर यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. ज्याच्यासोबत आपण राहतो त्याने जर केसाने गळा कापला तर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहत नाही, परंतु मी आत्महत्या करणार नाही," असे ते म्हणाले होते.

रविकांत तुपकर यांनी भाजपमध्ये यावं, अशी ऑफर भाजप नेते आशिष देशमुख यांनी दिली आहे. या ऑफरवर तुपकरांनी शनिवारी स्पष्टीकरण दिले आहे. "कुठल्याही भाजप नेत्याचा मला फोन आला किंवा ऑफर आली तरच मी त्यावर वक्तव्य करेल," असे तुपकरांनी सांगितले आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT