Maharashtra Politics : 'दबाव गट' तयार करण्यासाठी घटक पक्षांची मोर्चेबांधणी सुरू ; राजू शेट्टींच्या पुढाकारात कोल्हापुरात..

Mumbai : आपलं अस्तित्व संपेल, अशी भीती सतत या पक्षप्रमुखांच्या मनात आहे.
Raju Shetty
Raju Shettysarkarnama
Published on
Updated on

Kolhapur : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी पक्षबांधणीला सुरूवात केली आहे. आपल्या जागा वाढविण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष रणनीती आखत आहेत. निवडणुकीसाठी मोठ्या पक्षांची जोरदार तयारी सुरू असताना आता राज्यातील छोटे पक्ष एकत्र घेऊन आघाडी तयार करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या पक्षांची लवकरच कोल्हापूर येथे बैठक होणार आहे.

Raju Shetty
Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरी धमकी प्रकरणात NIA ची उच्च न्यायालयात धाव

अस्थिर राजकीय वातावरण आणि नेत्यांच्या सतत बदलत असलेल्या भूमिकेमुळे छोट्या पक्षांची गोची झाली आहे. मोठ्या पक्षांबरोबर जाताना आपलं अस्तित्व संपेल, अशी भीती सतत या पक्षप्रमुखांच्या मनात आहे. त्यामुळे या पक्षांनी एकत्र यावं, अशा हालचाली सुरू आहेत. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतला आहे.

Raju Shetty
Ravikant Tupkar ON bjp Offer : भाजपच्या ऑफरवर रविकांत तुपकराचं उत्तर ; 'भाजप नेत्याचा मला फोन आला..'

महिनाभरात या पक्षांची बैठक व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रागतिक विकास मंच नावानं ही आघाडी होणार आहे. यामध्ये 13 पक्ष समाविष्ट होतील. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, स्वराज्य पक्ष, आम आदमी पार्टी, सीपीआय, लाल निशाण, बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टी, जनता दल, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष,बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष, भाकप,माकप या पक्षांचा आहे. जर अशाप्रकारे आघाडी स्थापन झाल्यास राज्यातील अनेक मतदारसंघात ही आघाडी निर्णायक ठरेल. त्यामुळे या पक्षांच्या हालचालीकडे सर्वांचे लक्ष आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com