Swabhimani Shetkari Sanghatna andolan sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maan News : माण, खटावला दुष्काळ जाहीर करण्यासाठी 'स्वाभिमानी'ने अडवला रस्ता

Swabhimani Shetkari Sanghatna या आंदोलनाला राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता. मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.

Umesh Bambare-Patil

-विशाल गुंजवटे

Maan News : माण, खटाव तालुक्यामध्ये तीव्र दुष्काळ परिस्थितीमुळे चारा व पाणी टंचाई निर्माण झाली असून या दोन्ही तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, जनावरांच्या चारा पाण्याची तात्काळ व्यवस्था करावी. दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांवरील सर्व प्रकारची कर्जे माफ करावी, येथील शेतक-यांना पीक विम्याचे पैसे तात्काळ द्यावेत, आदी मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दहिवडी-फलटण रस्त्यावर बिजवडी येथे दोन तास रस्ता अडवून शासनाविरोधात घाोषणाबाजी केली.

दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने Swabhimani Shetkari Sanghatna १५ ऑगस्ट रोजी आंधळी धरणामध्ये जलसमाधी घेण्याचे आंदोलन पुकारले होते. मात्र दहिवडी Maan Khatav प्रशासकीय व्यवस्थेने आंदोलकांची समजूत काढत चर्चा करून मार्ग काढू म्हणत आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले होते. मात्र तहसिल कार्यलायाकडून मागण्यासंदर्भात चर्चा करण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने आज बिजवडीत रास्ता रोको केला

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.या आंदोलनाला राष्ट्रवादी कॉग्रेस,राष्ट्रीय समाज पक्ष,वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता.या मागण्या शासनाने मान्य न केल्यास दहिवडीत पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला.

रास्ता रोको प्रसंगी सर्व वाहने अडवून ठेवण्यात आली होती.मात्र दोनतीन वाहनांमधील प्रवाशांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना व पोलीसांना आपली अडचण सांगितल्यानंतर संघटनेने त्या वाहनांना लगेच रस्ता मोकळा करून देत शेतकऱ्यांमधील माणूसकी दाखवून दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, सुर्यभान जाधव, राजू मुळीक, केशव जाधव,दत्तू घार्गे, दादासो शिनगारे, मामूशेठ विरकर,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माणखटाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रशांत विरकर,वंचित आघाडीचे युवराज भोसले, विकास निंबाळकर,सतिश भोसले,राहूल शिनगारे,अविनाश गाढवे,आदींसह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. माण तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदारांना संघटनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Edited By Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT