Maan NCP News : अजित पवारांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही एकत्र : रामराजे निंबाळकर

Ramraje Naik Nimbalkar रामराजे निंबाळकर यांनी संवाद साधताना कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्ही गावागवात पोहोचवू.
Ramraje Naik Nimbalkar, Ajit Pawar, Sharad Pawar
Ramraje Naik Nimbalkar, Ajit Pawar, Sharad Pawarsarkarnama
Published on: 
Updated on: 

Maan NCP News : माण तालुक्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची सभा झाल्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे नेते माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी माण तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला व त्यांची मते जाणून घेतली. यावेळी रामराजे म्हणाले, आम्ही १९९९ ला खासदार शरद पवार यांना पंतप्रधान करण्याची स्वप्ने बघितली होती. त्याप्रमाणे आता अजित पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.

दहिवडी (ता. माण) येथे नुकताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार Sharad Pawar यांचा कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. त्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक आमदार रामराजे नाईक निंबाळकर Ramraje Naik Nimbalkar यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

त्यासाठी दहिवडीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे यांच्या निवासस्थानी बैठक झाली.यावेळी जिल्हा बॅंकेच उपाध्यक्ष अनिल देसाई, सुरेंद्र गुदगे, अर्जून खाडे, संदीप मांडवे, युवराज सुर्यंवशी, नंदकूमार मोरे, बाबासाहेब पवार, सागर पोळ, बाळासाहेब माने, प्रदिप जाधव, तानाजी जाधव, अभय मेनकुदळे, पिंटू जगदाळे, नारायण जाधव, बापूराव काळेल, दत्तू नरळे,आदी उपस्थित होते.

रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, खासदार शरद पवार साहेबांनी विकासाचे राजकारण शिकवले. भविष्यातील राजकारण विकासाचे ठेवण्यासाठी आम्ही हा कटू निर्णय घेतला आहे. २१ शतकात सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला देशातील प्रमुख राज्य करण्याचा ध्यास अजित पवार यांनी ठेवला आहे.

Ramraje Naik Nimbalkar, Ajit Pawar, Sharad Pawar
Satara Political News : सातारा लोकसभेबाबत खासदार उदयनराजेंची सावध प्रतिक्रिया; म्हणाले, लोकांचा आग्रह लक्षात...

१९९९ ला आम्ही शरद पवारांना पंतप्रधान करण्याची स्वप्ने बघितली. त्याप्रमाणे अजित पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. यावेळी रामराजे यांनी संवाद साधताना कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली.

बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्ही गावागवात पोहोचवू. सध्या माण तालुक्यात टंचाई परिस्थिती पाहता तातडीने टंचाई जाहीर करावी, अशी मागणी केली. तसेच आता रामराजेंनी जिल्हयाच्या राजकारणात न थांबता दिल्लीतील राजकारणात जावे, अशी भावना व्यक्त केली.

Edited By Umesh Bambare

Ramraje Naik Nimbalkar, Ajit Pawar, Sharad Pawar
Maan NCP News : रोहित पवारांनी शंभूराज देसाईंना डिवचले; म्हणाले, पालकमंत्री माण तालुक्यात किती वेळा आले होते...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Sharad Pawar
Satara Dcc Bank Result
Ranjitsinh Naik Nimbalkar Ramraje Naik Nimbalkar
Jaykumar Gore and Ramraje Naik Nimbalkar