Swabhimani Sanghatna Nivedan to collector sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Political News : कृष्णेच्या पाण्याची चोरी; स्वाभिमानी शेतकरी घेणार जलसमाधी

Umesh Bambare-Patil

Swabhimani Shetkari Sanghatna News : सध्या संपूर्ण राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. शेती व पिण्याच्या पाण्याची टंचाई सर्वत्र जाणवू लागली आहे. याचाच फायदा घेत राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात जाऊन ज्या तालुक्यात धरणे आहेत, त्या तालुक्याला एक थेंबही पाणी न मिळू देता बेकायदेशीरपणे पाण्याची चोरी सुरू आहे. यावर योग्य ती कारवाई न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येत्या १७ नोव्हेंबरला जिहे-कठापूर येथे जलसमाधी करण्याचा निर्णय अंगापूर येथील शेतकरी बैठकीत घेतला आहे.

सातारा Satara Farmers कोरेगाव, कराड तालुक्यातील असंख्य शेतकरी कृष्णा, उरमोडी नदी तसेच कण्हेर डाव्या कालव्यातून पाणी घेऊन शेती व शेतीपूरक उद्योग करतात. परंतु गेले अनेक दिवस या हंगामात सातारा सिंचन विभाग Irrigation Department व प्रकल्प विभाग यांचेकडून त्यांचा हक्काचे पाणी नियमबाह्य पद्धतीने अन्यत्र पळविले जात आहे.

दुष्काळ व टंचाईच्या नावाखाली बेकायदेशीर अधिकाराचा गैरवापर करून, शासन निर्णयाविरोधात जाऊन पाण्याची राजरोसपणे चोरी सुरू आहे. ही बाब सिंचन अधिकारी यांचे समोर आम्ही पुराव्यानिशी सिद्ध केली आहे, असे असतानाही सिंचन विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक व सूडभावनेने याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातच कृष्णेचे पात्र कोरडे पडले आहे, तर कण्हेर कालवा लाभक्षेत्रात कमी दाबाने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे ऐन हंगामात पाण्याअभावी पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन देशोधडीला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तसेच नदीपात्र कोरडे पडल्याने अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना अडचणीत आल्या आहेत. कमी पावसाचे कारण सांगून दिशाभूल करत जिहे-कठापूर योजनेतून या परिसराच्या हक्काचे पाणी नियमबाह्य पद्धतीने पळवल्याने कृष्णा व उरमोडी नदी भागातील सर्व शेतकरी अडचणीत आले आहेत. Maharashtra Political News

त्यामुळे यावर तत्काळ योग्यती कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. तसेच अशी परिस्थिती निर्माण करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा बाधित शेतकऱ्यांना बरोबर घेऊन १७ नोव्हेंबर रोजी कृष्णा नदीपात्रात जिहे-कठापूर येथे जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT