MP Udayanaraje met SP Sameer Shaikh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale News : महापुरुषांची बदनामी करणाऱ्या अपप्रवृत्तींना ठेचा : खासदार उदयनराजे

Satara Police खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सातारचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन त्यांना दिले.

Umesh Bambare-Patil

Udayanraje Bhosale News : महापुरुषांविषयक आक्षेपार्ह मजकूर समाज माध्‍यमांवर प्रसारित करत जातीय सलोखा बिघडविणाऱ्या अपप्रवृत्तींना ठेचलेच पाहिजे. साताऱ्यातील प्रकरणात जो युवक ताब्‍यात आहे, त्‍याच्‍याकडे चौकशी करत त्‍याला प्रोत्‍साहन देणाऱ्या, मदत करणाऱ्या सर्वांची चौकशी करा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे केली.

खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी आज सातारचे पोलिस Satara Police अधीक्षक समीर शेख यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन त्यांना दिले. यावेळी जिल्‍हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, माजी उपाध्‍यक्ष मनोज शेंडे, किशोर शिंदे, काका धुमाळ, ॲड. विनीत पाटील, गितांजली कदम, ॲड.वर्षा देशपांडे, विजय मांडके, विजय बडेकर, यांच्‍यासह इतर मान्‍यवर उपस्‍थित होते.

उदयनराजे म्‍हणाले, महापुरुषांची बदनामी करणाऱ्याला अल्‍पवयीन तरी कसे म्‍हणायचे. असा मजकुर प्रसारित झाल्‍यानंतर त्‍याबाबतची तक्रार करण्‍यात आली. त्‍यापुर्वी दोन दिवस हा प्रकार दाबण्‍याचा प्रयत्‍न झाला. असा प्रयत्‍न होणेच दुर्देवी आहे. याबाबत तक्रार देण्‍यासाठी पुढे येणाऱ्यांना नंतर धमकीचे मेसेज आले.

एकंदरच हा प्रकार गंभीर असून त्‍याची दखल आपण गंभीरतेने घ्‍यावी. ज्‍यांना धमकी आली आहे, त्‍यांना पोलिसांनी संरक्षण द्यावे. उगाच इतर कोणालाही तसेच विलासपूर येथे बंदोबस्‍त ठेवू नका, अशी सुचनाही त्‍यांनी यावेळी केली. महापुरुषांची बदनामी करण्‍याचे धाडस होतेच कसे, हा प्रश्‍‍न मनाला वेदना देणारा आहे. अशा प्रवृत्ती ठेचल्‍याच पाहिजेत.

या प्रवृत्तींमुळे सामाजिक शांतता धोक्‍यात येत आहे. सातारा शांतताप्रिय असून कोणत्‍याही अप्रिय घटना यापुर्वी घडलेल्‍या नाहीत. एकदा का जर ठिणगी पडली. रान पेटले तर मग त्‍याला कोणीही अडवू शकणार नाही. जिल्‍ह्‍याची लोकसंख्‍या आणि उपलब्‍ध पोलिस यंत्रणेचा विचार करता त्‍यांनाही ते शक्‍य होणार नाही. हे टाळायचे असेल तर कठोर कारवाई करणे आवश्‍‍यक आहे.

कोणीही असो. कोणत्‍याही जातीधर्माचा असो. त्‍याला धडा शिकवलाच पाहिजे. असे झाले तरच इतरांना पायबंद बसेल.छत्रपती शिवरायांची सर्वधर्म समभावाची शिकवण आम्‍ही जपत असून आम्‍ही साताऱ्यातील जातीय सलोखा बिघडून देणार नाही. पण त्‍यासाठी पोलिसांनी देखील अशांवर कठोर कारवाई करणे गरजेचे असल्‍याची भूमिका मांडली.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT