Satara NCP News : शरद पवारांची तोफ दहिवडीत धडाडणार; कोणावर निशाणा साधणार
Satara NCP News : राष्ट्रवादीतील फुटीनंतर खासदार शरद पवार यांनी राज्यभर विविध मतदारसंघात दौरे करुन पक्षाच्या कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचे काम करत आहेत. यातून भाजपसह अजित पवार गटावर ते सडेतोड टीका करत आहेत. आता येत्या २५ ऑगस्टला खासदार शरद पवार यांची सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहिवडी येथे कार्यकर्ता संवाद मेळावा व जाहीर सभा होणार आहे. माणच्या सभेत खासदार शरद पवार कोणावर निशाणा साधणार याची उत्सुकता आहे.
राष्ट्रवादीत NCP फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांतही अद्यापही संभ्रमावस्था आहे. नुकतीच अजित पवार Ajit Pawar गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रत्येक आमदारावर जबाबदारी दिली आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्याची जबाबदारी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे.
पक्ष फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार शरद पवार यांचा जिल्ह्यात दौरा झालेला नाही. येत्या २५ तारखेला कोल्हापूरकडे सभेच्या निमित्ताने जाताना ज्येष्ठ नेते पवार रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त दहिवडीत थांबणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रम होतील.
सकाळी साडेअकराच्या दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने दहिवडी बाजार पटांगणावर कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला आहे. त्यात ज्येष्ठ नेते पवार यांची तोफ धडाडणार आहे. या मेळाव्या ते अजित पवार गट, भाजपचे आमदार जयकुमार गोरे, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
पक्षातील फुटीनंतर सभेच्या निमित्ताने श्री. पवार प्रथमच जिल्ह्यात येत आहेत. त्यांचे माण तालुक्यात राष्ट्रवादीच्या वतीने जंगी स्वागत केले जाणार आहे. कोल्हापूरच्या जाहीर सभेसाठी जाताना रॅलीने येथून कार्यकर्ते त्यांच्यासोबत जाणार आहेत. त्यामुळे माणच्या सभेत खासदार शरद पवार कोणावर निशाणा साधणार याची उत्सुकता आहे.
Edited By : Umesh Bambare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.