Eknath Shinde  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Eknath Shinde : रोजच्या धावपळीला ब्रेक; मुख्यमंत्री रमले आपल्या स्ट्रॉबेरीच्या शेतात

रविकांत बेलोशे

भिलार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांसाठी सातारा जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ते दरे या आपल्या मूळ गावी मुक्कामी आले असून त्यांनी आपल्या शेतात लावलेल्या स्ट्रॉबेरी पिकाची पाहणी केली. तसेच शेतात छोट्या चार्जिंग गाडीतून सफारी मारली.

महाबळेश्वर (Mahabaleshwar) तालुक्यातील दरे या गावात सायंकाळी सरकारी हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री शिंदे दाखल झाले. आपल्या निवासस्थानी जाण्याअगोदर त्यांनी थेट आपले शेत गाठले आणि त्या ठिकाणी शेतीची व पिकाची पाहणी केली.

स्ट्रॉबेरी पिकामध्ये जावून त्यांनी स्वतःच्या हाताने स्ट्रॉबेरी तोडून खाल्ली. तसेच आपल्या बागेतील सुपारी झाडांचीही पाहणी केली. रोज होत असलेले राजकारण आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीतून काहीसा ब्रेक घेत मुख्यमंत्री शिंदे हे आज त्यांच्या मूळ गावी जात शेतात रमले आहेत.

यावेळी ते आपल्या गावातील काही सहकाऱ्यांशी देखील चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अगोदरपासूनच शेतीची आवड आहे. त्यामुळे ते आपल्या वडिलोपार्जित असलेल्या शेतीत लक्ष घालून शेती चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्याकडे लक्ष देतात.

दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शेतात सध्या स्ट्रॉबेरी, सुपारी, लवंग, वेलची, दालचिनी, कॉफी, पेरू, आंबा, फणस, चिक्कू, सफरचंद, मिरची, हळद अशी पिके आहेत. तर मागच्या वेळी त्यांनी स्वत: शेतीची मशागत केली होती. तर आता देखील राजकारणातून काहीसा ब्रेक घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा शेतात रमले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT